Lata Mangeshkar यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी अयोध्येमधील आचार्य पीठाच्या तपस्वी छावणीमध्ये  महायज्ञ संपन्न
महायज्ञ । PC: Twitter/ANI

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना कोविड 19 आणि न्युमोनिया याची लागण झाल्याने मुंबईच्या ब्रीज कॅन्डी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. 11 जानेवारीपासून आयसीयू मध्ये दाखल असलेल्या लता दीदींच्या प्रकृतीमध्ये सुधार व्हावा म्हणून प्रार्थना देशभरात सुरू असताना आज अयोद्धे मध्ये आचार्य पीठाच्या तपस्वी छावणी मध्ये राजसूर्य महायज्ञ करण्यात आला आहे. महायज्ञ तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमहंस आचार्य (Jagadguru Paramhans Acharya Maharaj) यांच्या नेतृत्वाखाली हा यज्ञ पार पडला आहे.

92 वर्षीय लता मंगेशकर यांच्या आरोग्यासाठी महामृत्युंजय आणि संकटमोचन हनुमानाच्या मंत्रांचा जप करण्यात आला सोबतच वेदमंत्रांच्या उच्चारांसहीत यज्ञशिलेमध्ये आहुती समर्पित करण्यात आली आहे. (हेही वाचा, Lata Mangeshkar In ICU: लता मंगेशकर Covid-19 संक्रमित; Breach Candy Hospital रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु).

ANI Tweet

दरम्यान जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांनी यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता दीदींची भेट घ्यावी अशी इच्छा देखील बोलून दाखवली आहे.

ब्रीज कॅन्डी हॉस्पिटल मध्ये लता मंगेशकर यांच्यावर डॉक्टर प्रतित समदानी यांच्या नेतृत्त्वाखाली उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये लता दीदींच्या प्रकृतीमध्ये किंचित सुधारणा आहे. पण हितचिंतकांनी प्रकृतीमध्ये सुधार व्हावा म्हणून प्रार्थना करा असे आव्हान केले होते. यावेळी मंगेशकर कुटुंब आणि हॉस्पिटल कडूनही त्यांच्या आरोग्याबाबत सोशल मीडीयामध्ये वायरल होत असलेल्या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असं म्हटलं आहे.