Happy Women's Day 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज ठाकरे ते सॅन्ड आर्टिस्ट Sudarsan Pattnaik यांनी महिला दिनी नारी शक्तीला सलाम करत दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा
Happy Women's Day 2021| Photo Credits: Twitter/ Sudarsan Pattnaik

आज 8 मार्च अर्थात जागतिक महिला दिन! जगभरात या दिवसाचं औचित्य साधत महिला शक्तीला सलाम करण्याचा दिवस. International Women's Day च्या शुभेछा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह प्रसिद्ध सॅन्ड आर्टिस्ट सुदर्शन पटनायक यांनी देखील आज सकाळी ट्वीटर च्या माध्यमातून दिल्या आहेत. यावेळेस त्यांनी स्त्रीशक्तीला सलाम करत त्यांच्या योगदानाचे आभार मानले आहेत. Happy Women’s Day 2021 Quotes: जागतिक महिला दिन निमित्त सुधा मूर्ती ते Melinda Gates यांचे प्रेरणादायी विचार शेअर करत यंदाचा 8 मार्च करा खास!

महिला दिनाची सुरुवात ही 20 व्या दशकात झाली होती.पण 8 मार्च 1857 रोजी अमेरिकेमधील न्युयॉर्क शहरातील काही महिला कामगारांनी पगार वाढवून देण्याची मागणी केली होती. Britannica च्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी त्यावेळी महिलांचा आवाज दाबून ठेवला. पुन्हा काही वर्षांनी त्या सर्व महिलांनी एकत्रित येऊन महिलांची स्वतंत्र्य युनियन स्थापन केली. 20 व्या दशकामध्ये महिलांचे अधिकार आणि त्यांना मिळणारी असमानतेची वागणूक या मुद्द्यांवरुन महिला दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. International Women's Day 2021 Date: जागतिक महिला दिन का साजरा केला जातो? जाणून घेऊया या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

राज ठाकरे

मंत्री आदित्य ठाकरे

सॅन्ड आर्टिस्ट सुदर्शन पटनायक

दरम्यान दरवर्षी एका विशिष्ट थीम वर महिला दिन साजरा करण्याची पद्धत आहे. यंदा तो कोविड 19 जागतिक आरोग्य संकटाच्या काळात महिलांच्या योगदानाविषयी आणि त्यांच्या नेतृत्त्वाविषयी होती. त्यामुळे तुम्हांला घरापासून रूग्णालयापर्यंत या मागील वर्षभराच्या काळात ज्या ज्या महिलांनी मदत केली असेल त्यांना आजच्या महिला दिनी धन्यवाद म्हणायला बिलकूल विसरू नका.