Happy Women’s Day 2021 Quotes: जागतिक महिला दिन निमित्त सुधा मूर्ती ते Melinda Gates यांचे प्रेरणादायी विचार शेअर करत यंदाचा 8 मार्च करा खास!
International Womens Day 2021 (Photo Credits: Team Latestly)

International Women’s Day 2021: दररोज घर, काम, संसार, प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ यांच्यामधील तारेवरची कसरत सांभाळत 100% देण्याचा प्रयत्न करणार्‍या प्रत्येक महिलेचा दिवस साजरा करण्यासारखाच असतो पण 8 मार्च, जागतिक महिला दिवस (International Women’s Day) हा एक दिवस थोडा स्पेशल आहे. या दिवसाच्या निमित्ताने अनेकांच्या त्यांच्या आयुष्यातील 'तिचं' महत्त्व अधोरेखित करण्याचा एक खास दिवस आहे. यंदाचा इंटरनॅशनल वूमन्स डे हा कोविड 19 काळात महिलांना देखील समान संधी मिळावी यासाठी महिलांच्या नेतृत्त्व गुणांना वाव देण्यासाठी साजरा केला जाणार आहे. मग या जगात आपल्या कर्तृत्त्वाने इतरांसाठी प्रेरणा ठरणार्‍या अनेक असामान्य महिलांना आदर्श मानून एक नव्याने सुरूवात करण्यासाठी हे काही प्रेरणादायी Quotes यंदाच्या महिला दिनाच्या निमित्ताने सोशल मीडीयात मराठमोळे मेसेजेस, HD Images च्या द्वारा Facebook Messages, WhatsApp Messages, WhatsApp Status म्हणून शेअर करायला विसरू नका.

महिला दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्यापुरता मर्यादित नाही. या दिवसाच्या निमित्ताने आपल्या आजुबाजूच्या, शून्यातून विश्व निर्माण करणार्‍या अनेकींमधून सकारात्मकता घेऊन पुढील वर्षभर वाट चालण्यासाठी, प्रेरणा घेण्यासाठी विचारांची आदान-प्रदान करण्याचा दिवस आहे. मग या महिला दिनी सुधा मूर्ती ते ऑप्रा विंफ्रे पर्यंत आपल्या क्षेत्रात ठसा उमटवणार्‍या या महिलांचे विचार पहा काय सांगतात. International Women's Day 2021 Date: जागतिक महिला दिन का साजरा केला जातो? जाणून घेऊया या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास.

जागतिक महिला दिन 2021

Happy Women's Day Quotes| File Images
Happy Women's Day Quotes| File Images
Happy Women's Day Quotes| File Images
Happy Women's Day Quotes| File Images

कोरोना संकटकाळात महिला कधी शास्त्रज्ञ तर नर्स, डॉक्टर, केअर टेकर म्हणून पुढे येऊन लढल्या. पण अनेक क्षेत्रात त्या पुरूषांच्या बरोबरीने काम करत असूनही जगभरात त्यांना 11% कमी मानधनात काम करावं लागत असल्याचं समोर आलं आहे. कोरोना संकट काळात जिथे महिलांनी नेतृत्त्व केले तिथे अधिक सकारात्मक परिणाम पहायला मिळाले आहेत. म्हणूनच यंदाच्या जागतिक महिला दिनी पुरूषांच्या बरोबरीने स्त्रियांना समान हक्क आणि अधिकार मिळावेत म्हणून आवाज उठवा आणि भविष्य सुरक्षित करण्यासाठी एक पाऊल पुढे येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.