International Women's Day 2021 Date: जागतिक महिला दिन का साजरा केला जातो? जाणून घेऊया या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास
Women's Day 2021 (Photo Credits: File Image)

Women's Day 2021 Date: आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women's Day) दरवर्षी 8 मार्च ला साजरा केला जातो. जगभरातील सर्व महिलांप्रती आदर, प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. महिलांची विविध क्षेत्रातील भरारी, कार्य याचा सन्मान करण्याचा हा दिवस. दरवर्षी विविध थीमच्या आधारावर महिला दिनाचे सेलिब्रेशन होते. यंदा 'Women in leadership: an equal future in a COVID-19 world' अशी महिला दिनाची थीम ठरवण्यात आलेली आहे. कोरोना संकटात जगभरातील अनेक महिलांनी दिलेले योगदान अधोरेखित करण्यासाठी ही थीम ठरवण्यात आली आहे.

जागतिक महिला दिन का साजरा केला जातो?

महिला दिनाची सुरुवात ही 20 व्या दशकात झाली होती. परंतु, 8 मार्च 1857 रोजी अमेरिकेच्या न्युयॉर्क शहरातील काही महिला कामगारांनी पगारवाढीची मागणी केली होती. Britannica च्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी त्यावेळी महिलांचा आवाज दाबून ठेवला. पुन्हा काही वर्षांनी त्या सर्व महिलांनी एकत्रित येऊन महिलांची स्वतंत्र्य युनियन स्थापन केली. 20 व्या दशकामध्ये महिलांचे अधिकार आणि त्यांना मिळणारी असमानतेची वागणूक या मुद्द्यांवरुन महिला दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.

प्रसिद्ध जर्मन अॅक्टीव्हिस्ट Clara Zetkin यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे 1910 मध्ये आंतरराष्ट्रीय काँग्रेसने Women's Day साजरा करण्याचे आणि त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्याचे मान्य केले. या निर्णयानंतर 19 मार्च 1911 रोजी ऑस्ट्रिया, डेन्मार्क आणि जर्मनी मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर 1921 रोजी महिला दिनाची तारीख 8 मार्च अशी करण्यात आली. तेव्हापासून संपूर्ण जगभरात 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो.