
कुटुंब हा आपल्या जडणघडणीमध्ये कळत-नकळत प्रभाव टाकत असतो. कोविड 19 जागतिक आरोग्य संकटाच्या काळात आपण कुटुंबाची खरी किंमत काय असते हे जवळून अनुभवलं आहे. मग याच नात्यांना घट्ट करणारी एकत्र कुटुंब पद्धती हरवत चाललेल्या जगात पालक दिनाच्या निमित्ताने तुमच्या आई-वडिलांना, आई-बाबांच्या अनुपस्थितीत काळजी घेणार्या मोठ्या भावंडांना आवर्जुन धन्यवाद म्हणण्यासाठी यंदाचा पेरेंट्स डे साजरा करा. सोशल मीडीयात फेसबूक मेसेजेस, Wishes, Quotes, HD Images यांच्याद्वारा तुम्ही पेरेंट्स डे (Parents Day) च्या शुभेच्छा देऊ शकता.
पेरेंटस डे हा जुलै महिन्याच्या शेवटच्या रविवारी साजरा केला जातो. त्यामुळे यंदा पेरेंट्स डे 24 जुलै दिवशी साजरा केला जाणार आहे. या दिवसांच्या निमित्ताने तुमच्या पालकांना धन्यवाद नक्की म्हणा.नक्की वाचा: Parents Day 2022 Date: यंदा पालक दिन 24 जुलैला; जाणून जगभरात हा दिवस साजरा करण्याच्या विविध तारखा.
पेरेंट्स डे 2022 च्या शुभेच्छा





पालकांचं ऋण फेडणं कोणत्याच पाल्याला शक्य नाही. पण किमान वर्षातून एकदा त्यांच्याप्रति कृतज्ञता मात्र आपण नक्कीच मानू शकतो. कुटुंबामधील जिव्हाळा वाढावा आणि जपता यावा यासाठी पेरेंट्स डे सेलिब्रेशन हे एक महत्त्वाचं कारण आहे. Global Parents Day हाचा भारतामध्ये नॅशनल पेरेंट्स डे म्हणून साजरा केला जातो.