Parents Day 2022 Date: यंदा पालक दिन 24 जुलैला; जाणून जगभरात हा दिवस साजरा करण्याच्या विविध तारखा

पॅरेंट डे (Parents Day) अर्थात कुटुंब दिवस हा जगभरात चौथ्या रविवारी साजरा केला जातो. यंदा हा दिवस 24 जुलै दिवशी साजरा केला जाणार आहे. हा दिवस मुलांच्या विकासासाठी कुटुंबाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. पूर्वी भारतात हमखास एकत्र कुटुंब पद्धती होती. पण ग्लोबलायझेशनचा परिणाम कुटुंब पद्धतीवर झाला आणि आता सारेच विभक्त कुटुंबामध्ये राहतात. यामुळे अनेकदा मुलांना नाती ओळखीची नसतात. या पालक दिनाच्या निमित्ताने ती ओळख नव्याने होते.

मुलांना, पाल्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी, स्वावलंबी करण्यासाठी, संस्कारक्षम करण्यासाठी घरातील वातावरण, पालकांचा वावर महत्त्वाची भूमिका बजावत असतो. घरात आजी-आजोब आणि नातवंडांचं नातं, चुलत भावा बहिणीचं नातं, आई-वडीलांसोबत मुलांचं नातं हे वयाच्या विविध टप्प्यात बहरत जात असतं. त्यामधूनच समाजशील माणूस घडत असतो त्यामुळे कुटुंब ही आपल्या संस्कृतीची खास ओळख आहे. आजच्या दिवशी त्या प्रत्येक घराच्या आधारस्तंभाचे आभार मानायला विसरू नका. नक्की वाचा: जागतिक पालक दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा Greetings, Messages, whatsapp Status, Images,Facebook च्या माध्यमातून देऊन हा दिवस आपल्या आई-बाबांसाठी करा खास.

जगभरात पालक दिन साजरा करण्याच्या विविध तारखा कोणत्या?

जगभरात पेरेंट्स डे साजरा करण्याची तारीख वेगवेगळी आहे. भारतामध्ये मात्र Global Parents Day हाच National Parents Day म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जुलै महिन्याच्या चौथ्या रविवारी आहे. कोरिया मध्ये 8 मे दिवशी पालक दिन साजरा केला जातो. व्हिएतनाम मध्ये 7 जुलैला साजरा केला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने 1 जून हा दिवस जागतिक पालक दिन म्हणून साजरा केला जावा अशी घोषणा केली.