Global Parents Day Marathi Wishes: असं म्हणतात आई ही मुलाला जगात आणते तर बाबा त्याच मुलाला जग दाखवतो. असे आई-वडिल लाभणे म्हणजे त्या मुलाचे जणू भाग्यच असते. अशा या आईवडिलांना आपण त्या पाल्याचे 'पालक' म्हणतो. जगात वावरण्यासाठी माया, प्रेम, संस्कार, संयम यांसारख्या गोष्टींची शिकवण देणा-या पालकांचा सन्मान करण्यासाठी 'जागतिक पालक दिन' (Global Parents Day) साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने 1 जून हा दिवस जागतिक पालक दिन म्हणून साजरा केला जावा अशी घोषणा केली. जगभरातील पालकांचे प्रेम, वचनबद्धता आणि निःस्वार्थ प्रयत्नांना त्यांच्या मुलांकडे सन्मानित करण्यासाठी आणि मान्य करण्यासाठी हा दिवस घोषित करण्यात आला.
आईवडिलांचे ऋण कधीही फेडता येणार नाही असे आहेत. मात्र त्याची जाणीव आपल्याला कायम राहावी यासाठी आज जागतिक दिनाचे औचित्य साधून तुम्ही Messages, Greetings, Whatsapp च्या माध्यमातून या दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.
आईची ती प्रेमळ माया,
बाबांची ती वटवृक्षाची छाया
देवाने घडविली
ही अजब किमया
पालक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
आई विना घरं रिकामी वाटतं
तर बाबां विना आयुष्य अधूरं वाटतं
पालक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
पैशाने सर्व काही मिळवता येईल
मिळणार नाही ती केवळ आईच्या रुपात प्रेमळ माऊली
अन् बाबांच्या रुपात प्रेमाची सावली
पालक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
हेदेखील वाचा- आई-वडिल होणं सोपं नाही, कसा अनुभवाल तो नऊ महिन्यांचा अद्भूत प्रवास? वाचा सविस्तर
Parents Day Wishes (Photo Credits: File) Parents Day Wishes (Photo Credits: File)आपल्या पाल्यासाठी दिवसरात्र झटणा-या
तसेच त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अथक परिश्रम करणा-या
सर्व पालकांना जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मनातलं ओळखणारी आई
आणि भविष्य ओळखणारा बाप
हे पाल्याचे एकमेव ज्योतिष असतात
पालक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
तुमच्या जन्मापासून त्यांच्या मरणापर्यंत, त्यांनी आपलं “सारं आयुष्य” खर्च केलेलं असतं त्या थोर व्यक्ती म्हणजे तुमचे आईवडिल. आईवडिल यांचे महत्व शब्दांत सांगता येणार नाही. कारण हे केवळ दोन शब्द नसून प्रत्येक पाल्याचे संपूर्ण आयुष्य आहे. आपल्या पाल्यासाठी दिवसरात्र झटणा-या सर्व पालकांना जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा