Gujrat Rape: सुरतमध्ये 15 वर्षांच्या मुलाने केला 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार; दिली जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल
Representative Image

Gujrat Rape Crime: गुजरातमध्ये (Gujrat) एका 13 वर्षीय मुलीवर 15 वर्षाच्या मुलाने बलात्कार (Rape) केल्याची घटना धक्कादायक घटना घडली आहे. लिंबायत (Limbayat) येथील एका महिलेने आपल्या मुलीवर अल्पवयीन मुलाने दोन महिन्यांपूर्वी बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली आहे. घटनेनंतर आरोपी मुलाने पिडीत मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याने, तिने हे कोणालाही सांगितले नाही. त्यानंतर मुलाने पुन्हा एकदा असाच प्रयत्न केला असता पीडितेने तिच्या आईला याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली गेली.

या प्रकरणी पोलिसांनी आयपीसी आणि पॉक्सो अंतर्गत बलात्कार आणि गुन्हेगारी धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी लिंबायत पोलीस अधिक तपास करत आहेत.

अहवालानुसार. 27 जानेवारी रोजी पीडितेची आई कामावरून घरी आली तेव्हा पीडित मुलगी रडत होती. तिने मुलीला काय झाले असे विचारले असता तिने सांगितले की आरोपी मुलगा दोन महिन्यांपूर्वी घरी कोणी नसताना त्यांच्या घरी आला होता. आरोपी पीडितेच्या आईकडे काम करत असल्याने त्याने तिला आपल्या घरात येऊ दिले आणि पाणी दिले. यानंतर आरोपीने दरवाजा बंद करून तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपीने तिला आणि तिच्या लहान भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. (हेही वाचा: UP Shocker: दुबईमधून पतीने दिली पत्नीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्याची सुपारी; 4 जणांना अटक, जाणून घ्या सविस्तर)

त्यानंतर 27 जानेवारी रोजी पीडितेची आई नोकरीवर असताना आरोपीने पीडितेला आपल्याला घरी यायचे आहे असे सांगून, भावाला दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यास सांगितले. यानंतर पीडिता घाबरली व तिने आई घरी परत आल्यावर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान,  महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात एका 6 वर्षीय अल्पवयीन दलित मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुलीचा काका तिच्याशी गैरकृत्य करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करून तपास सुरु करण्यात आला आहे.