Arrest | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

पाकिस्तान (Pakistan) मधील दहशतवादी संंघटना आयएसआय (ISI) चा एजंट म्हणून काम करत असलेल्या एकाला गुजरात (Gujrat) मध्ये राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी (NIA) ने अटक केली आहे. पश्चिम कच्छ (West Kachha) मध्ये या व्यक्तीला अटक करण्यात आली असुन त्याचे नाव रझाकभाई कुंंभार (Razakbhai Kumabhar) असे असल्याचे समजतेय.एनआयएच्या माहितीनुसार, रझाकभाई हा भारतीय सैन्याची गुप्तहेरी करत असल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. भारतातील काही संवेदनशील आणि महत्वाच्या आस्थापनांचे फोटो रझाकभाई याने शेअर केले होते, पाकिस्तान मध्ये आयएसआयच्या हँडलर्स सोबत तो भारतीय सशस्त्र दलांच्या हालचालीची माहितीही शेअर करत असल्याचे म्हंंटले जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, हे प्रकरण चांदोली जिल्ह्यातील मुगलसरायच्या मोहम्मद रशीदच्या अटकेवरून लखनऊच्या गोमती नगर पोलिस ठाण्यात 19 जानेवारी रोजी नोंदविण्यात आलेल्या एफआयआरशी संबंधित आहे. ज्यामध्ये यावर्षी एप्रिलमध्ये एनआयएने पुन्हा गुन्हा दाखल केला. चौकशीदरम्यान राशिद पाकिस्तानच्या डिफेन्स / आयएसआय हँडलरच्या संपर्कात असल्याचे आणि दोनदा पाकिस्तानला भेट दिल्याचे समोर आले होते.

ANI ट्विट

दरम्यान, NIA ने शुक्रवारी रझाकभाई याच्या घरी तपास केला असता त्याने Paytm ने 5,000 रुपये एका रिझवानच्या खात्यात पाठवल्याचे समजले, आयएसआय एजंटच्या निर्देशानुसार रझाकभाई यांनी ही रक्कम रशिद नामक व्यक्तीला पाठविली होती. यासोबतच अन्यही काही कागदपत्रे NIA च्या टीमने जप्त केली आहेत.