Tik Tok (Photo Credits-Gettey Images)

सोशल मीडियावरील व्हिडिओसाठी प्रसिद्ध असलेले टीकटॉक अॅपचे जगभरात करोडोच्या संख्येन युजर्स आहेत. तर व्हिडिओच्या माध्यमातून एखाद्या समोर आपली कला सादर करणे ही चांगली बाब आहे. मात्र ही कला सादर करताना कोणत्याही गोष्टीची काळजी न घेतल्यास मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर गुजरात (Gujrat) मधील प्रसिद्ध टिकटॉक स्टारला किरकोळ वादातून हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. किर्ती पटेल असे टिकटॉक स्टारचे नाव आहे.

किर्ती पटेल हिचे टिकटॉकवपृर बहुसंख्येने फॉलोअर्स आहेत. तसेच विविध पद्धतीचे व्हिडिओ शूट करुन ते टिकटॉकवर पोस्ट केल्याने ती गुजरात मध्ये प्रसिद्ध झाली होती. तर तिच्याच मैत्रीणीने एका टिकटॉकच्या व्हिडिओ भरवाड समाजाला उद्देशून वाईट शब्द वापरला होता. यामुळेच वाद निर्माण होत तिची भरवाड समाजासोबत वाद झाले. त्यानंतर हा वाद एवढा वाढला की एकमेकांना मारहाण करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. तर या वादावर तोडगा काढण्यासाठी एक बैठक सुद्धा बोलावली पण तेव्हा दोन गटात तुफान राडा झाला.(All about TikTok: तुम्हीपण 'टिक टॉक' Video बनवता?)

किर्ती हिच्या बाजूने एका तरुणाने भरवाड समाजातील एकाच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. यामध्ये व्यक्ती गंभीर जखमी झाला. यामुळे किर्ती आणि तिच्या मित्रांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर किर्ती हिच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप लावत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास केला जात असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.