 
                                                                 गुजरात (Gujrat) मध्ये एका गोशाळेत कोविड सेंटर सुरु केले आहे. बनासकांठा जिल्ह्यातील या सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार हे आयुर्वेदिक औषधांच्या माध्यमातून केले जातात. खासियत अशी की, औषधे ही गाईचे दूध आणि गोमुत्रापासून तयार करण्यात आली आहेत. येथे कोरोनाच्या अशा रुग्णांवर उपचार केले जात आहेत ज्यांच्यामध्ये हलकी लक्षणे दिसून येत आहेत. या कोविड सेंटरला वेदालक्षन पंचगव्य आयुर्वेदिक कोविड आयसोलेशन सेंटर असे नाव दिले आहे. सध्या येथे 7 रुग्णांवर उपचार केला जात आहेत.(Cow Urine and Coronavirus: 'रोज सकाळी गोमुत्र प्या आणि Covid-19 ला दूर ठेवा'; BJP आमदाराचा अजब दावा Watch Video)
इंडियन एक्सप्रेस यांच्यासोबत बातचीत करताना गोशाळेचे ट्रस्टी मोहन जाधव यांनी असे म्हटले की, रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांनी असे म्हटले का, आम्ही या सेंटरची सुरुवात 5 मे रोजी केली होता. दीसा तालुक्यातील एका गावात 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यात आले होते. येथे 8 आयुर्वेदिक औषधांच्या माध्यमातून उपचार केले जात आहेत.
मोहन जाधव यांनी पुढे असे म्हटले की, येथे मुख्य रुपात कोविड19 ची लक्षण असलेल्या रुग्णांना पंचगव्य आयुर्वेद चिकित्सेचा वापर केला जात आहे. आम्ही गौ तीर्थाचा वापर करतो. जे देशी गाय आणि अन्य आयुर्वेदिक मुत्रांपासून तयार केले जाते. याचा खोकल्यासाठी वापर केला जातो. तसेच एक प्रतिरक्षा बूस्टर च्यवनप्राश असून ते गाईच्या दूधापासून तयार केले जाते.(कोरोनावर उपचार करण्यासाठी DRDO चे औषध 2-DG चा वापर केला जाणार; DGCI ने आपत्कालीन वापरास दिली मंजुरी)
दरम्यान, या कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. येथे 24 तास दोन आयुर्वेदिक डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या व्यतिरिक्त सेंटरमध्ये MBBS डॉक्टरांचा सुद्धा सल्ला घेतला जातो. ज्या रुग्णांना एलोपॅथिक औषधांची गरज भासते त्यांना याचे डोस सुद्धा दिले जातात. या महिन्याच्या सुरुवातीला गुजरात सरकारने गावात लोकल कोविड सेंटर उभारण्याचा सल्ला दिला होता. मात्र आता संपूर्ण राज्यात 10 हजारांहून अधिक कोविड सेंटर तयार करण्यात आले आहेत. या सेंटर्समध्ये जवळजवळ 1 लाख 20 हजार बेड्स आहेत.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
