कोरोनावर उपचार करण्यासाठी DRDO चे औषध 2-DG चा वापर केला जाणार; DGCI ने आपत्कालीन वापरास दिली मंजुरी
DRDO (PC - Facebook)

भारत सध्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus) दुसर्‍या लाटेचा सामना करत आहे. अशातचं भारतासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. डॉ. रेड्डी यांच्या प्रयोगशाळेच्या सहकार्याने डीआरडीओच्या लॅब इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन अॅण्ड अलाइड सायन्सेस द्वारा निर्मित कोरोनाचे ओरल औषध 2- डिऑक्सी-डी-ग्लूकोज ला भारतातील आपत्कालीन वापरासाठी मंजूर मिळाली आहे. औषधाच्या क्लिनिकल चाचणीनुसार, हे औषध रुग्णालयातील कोरोना रूग्णांच्या त्वरित पुनर्प्राप्तीसाठी उपयुक्त आहे. तसेच हे औषध रुग्णांच्या ऑक्सिजनची आवश्यकता कमी करते.

हे औषध घेतल्यानंतर कोरोना रुग्णांची आरटी-पीसीआर चाचणी नकारात्मक आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या साथीच्या रोगात कोरोना विषाणूंशी लढा देणाऱ्यांसाठी हे औषध खूप फायदेशीर ठरू शकते. कोरोना साथीच्या रोगाविरूद्ध पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या भूमिकेनंतर डीआरडीओने कोरोनाचे औषध 2-DG बनविण्यास पुढाकार घेतला. (वाचा - कोरोना विरूद्ध लवकरचं चौथी लस येणार; आपत्कालीन वापरासाठी Zydus Cadila मागणार ZyCoV-D लसीची परवानगी)

दरम्यान, एप्रिल 2020 मध्ये, साथीच्या पहिल्या लाटेच्या वेळी, INMAS-DRDO वैज्ञानिकांनी हैदराबादच्या सेन्टर फॉर सेल्युलर एंड मॉलिक्यूलर बायोलॉजी (CCMB) च्या मदतीने प्रयोगशाळेत प्रयोग केले. या प्रयोगात हे अणू SARS-CoV-2 विषाणूविरूद्ध प्रभावीपणे काम करत आहेत. याआधारे डीसीजीआयने मे 2020 मध्ये या औषधाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चाचणीस मान्यता दिली.

डीआरडीओने त्याच्या उद्योग भागीदार डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज (डीआरएल, हैदराबाद) यांच्यासमवेत COVID-19 रूग्णांमध्ये औषधाची सुरक्षा आणि कार्यक्षमतेची चाचणी चाचणी सुरू केली. मे ते ऑक्टोबर 2020 दरम्यान घेण्यात आलेल्या चाचण्यामध्ये हे औषध कोविड रूग्णांसाठी सुरक्षित असल्याचे आढळले. तसेच या औषधामुळे कोरोना रुग्णांच्या पुनर्प्राप्तीमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली.