Amit Shah On Gujarat Riots | (Photo Credit - Twitter/ANI)

गुजरात दंगल (Gujarat Riots 200) प्रकरणावर केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah On Gujarat Riots) यांनी प्रथमच सविस्तर भाष्य केले आहे. गुजरात दंगल प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी वृत्तसंस्था एएनआयला एक मुलाखत शनिवारी (25 जून) दिली. या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, एका प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर 'सत्य सोन्याप्रमाणे बाहेर आले. या प्रकरणात झालेल्या खोट्या आरोपांमुळे मोदीजी आजही दु:ख झेलत आहेत'. गृहमंत्री शाह यांनी पुढे सांगितले की, ''18-19 वर्षांच्या लढाईत, देशातील इतका मोठा नेता असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी एक शब्दही बोलले नाहीत. भगवान शंकरांनी विषप्राशण करुन पचवल्याप्रमाणे मोजीजी लढत राहिले. या सगळ्या वेदना झेलताना मी मोदींना जवळून पाहिले आहे, असेही शाह म्हणाले.

'न्यायालयीन लढाई संयमाने लढायची असते. ती एक प्रदीर्घ लढाई असते. आमच्याकडे सत्य असूनही आम्ही काहीच बोललो नाही. मोठ्या आणि खंबीर मनाचाच व्यक्ती अशा प्रकारची भूमिका घेऊ शकतो', असे सांगत अमित शाह म्हणाले, दंगलीनंतर गुजरातचे तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर झालेले आरोप राजकीय हेतूने करण्यात आले होते. या निकालानंतरही आपण म्हणू शकता हे सर्व आरोप राजकीय हेतूनेच करण्यात आले होते.

सर्वोच्च न्यायालायाने गुजरात दंगल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री) यांच्यावरील आरोप दूर केले आहेत. दंगल घडली तेव्हा लष्कराला पाचारण करण्यास वेळ झाली, पोलीस आणि प्रशासनाने हे प्रकरण हाताळण्यास दिरंगाई केली असे विचारले असता अमित शाह म्हणाले, राजकीय हेतुने प्रेरीत पत्रकारांनी आणि काही एनजीओंनी या आरोपांचा प्रचार केला. त्यांच्याजवळ एक भक्कम तंत्र होते. त्यामुळे लोक खोट्यालाच खरे मानू लागले.

ट्विट

अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीला काँग्रेसकडून होत असलेल्या विरोधावरही जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, मोदींनी एसआयटीसमोर हजर होताना हे नाटक केले नाही. माझ्या समर्थनासाठी पुढे या. आमदार खासदारांना बोलवा, धरणे आंदोलन करा. उलट मोदींनी म्हटले की, एसआयटी माझी चौकशी करत असेल तर मी त्यांना सहकार्य करेन.