प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

बॉलिवूडच्या चित्रपटात एक गाणं आहे, लव्ह के लिए कुछ भी करेगा! त्यामुळे गुजरातमधील एका तरुणीने या गाण्याच्या बोल वरुन प्रियकरासाठी स्वत:च्या घरावर डल्ला मारला आहे. तसेच प्रियकराला पायलट ट्रेनिंगसाठी तिने करोडी रुपयांची घरातच हेराफेरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर पोलिसांनकडून या दोघांना अटक करण्यात आली आहे.

प्रियांका परसाना असे या तरुणीचे नाव आहे. प्रियांकाचे हेत शाह या नावाच्या मुलासोबच प्रेमसंबंध होते. तसेच हेत या तरुणाला पायलट बनण्यासाठी पैशांची मदत करण्यासाठी प्रियांकाने घरातून दागिने आणि पैशांची जवळजवळ 1 करोड रुपयांचा ऐवज लंपास करुन घरातून पळ काढला. मात्र घराबाहेर गेलेल्या आईला आणि बहिणीला घरी परतल्यांनतर चोरी झाल्याचे समजले. त्यावेळी त्यांनी पोलिसांकडे चोरी झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला शोधण्यास सुरुवात केली असता त्यांना प्रियांकानेच चक्क घरातून ही चोरी केल्याचे समजले.

पोलिसांनी प्रियांका आणि हेत या दोघांना अटक केली आहे. तर चौकशी दरम्यान प्रियांकाने हेत ह्याला पायलट ट्रेनिंगसाठी करोडो रुपये घरातून चोरी केल्याचे सत्य सांगितले.