नोव्हेंबर महिन्यात GST च्या कमाईचा नवा रेकॉर्ड, सरकारी खात्यात 131526 कोटी रुपयांची भर
प्रतिकात्मक फोटो Photo Credit: PTI

यंदाच्या वर्षात नोव्हेंबर महिन्यात सरकारची जीएसटीच्या (GST) माध्यमातून बक्कळ कमाई झाली आहे. सरकारच्या मते नोव्हेंबर महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून 1,31,526 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. जीएसटीची ही रक्कम दुसरी मोठी रक्कम आहे. यापूर्वी रेकॉर्ड स्तर एप्रिल महिन्यात सरकारला जीएसटीच्या माध्यमातून 1.41 लाख कोटी रुपयांनी कमाई करता आली होती. एप्रिल नंतर नोव्हेंबर मध्ये दुसऱ्या रेकॉर्ड स्तरावर 1.31 कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले आहे.

जुलै 2017 मध्ये जीएसटी लागू करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा जीएसटी कलेक्शन मध्ये रेकॉर्ड कायम होता. देशात जशीजशी अर्थव्यवस्था रुळावर आली तेव्हा कारखाने आणि काम-उद्योग जोर पकडू लागला आहे. याचे परिणाम असे की, जीएसटी कलेक्शन मध्ये नोव्हेंबर मध्ये दुसऱ्यांदा एक नवा रेकॉर्ड दिसून आला.(दिल्ली सरकारचा पेट्रोलवरील VAT हा 30 टक्क्यांवरुन 19.40% करण्याचा निर्णय, नवे दर आज मध्यरात्री पासून होणार लागू)

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने नोव्हेंबर मध्ये जीएसटी कलेक्शन 1,31,526 कोटी रुपये झाल्याची माहिती देण्यात आली आहे. अर्थमंत्रालयाच्या मते, या संपूर्ण कलेक्शन मध्ये सीजीएसटी 23,978 कोटी रुपये आणि एसजीएसटी 31,127 कोटी रुपये आहे. तर आयजीएसटीच्या खात्यात 66,815 कोटी रुपयांची रक्कम आहे. यामध्ये सामानांच्या आयातीच्या माध्यमातून 32,165 कोटी रुपयांच्या रक्कमेचा समावेश आहे. सरकारच्या मते, सेस हा 9606 कोटी रुपये मिळाला आहे. यामध्ये सुद्धा आयत करण्यात आलेल्या सामानावर 653 कोटी रुपयांच्या टॅक्सचा समावेश आहे.

सीजीएसटीचा अर्थ आहे की, सेंट्रल गुड्स अॅन्ड सर्विसेस टॅक्स जो केंद्राच्या खात्यात जातो. एसजीएसटीचा अर्थ स्टेट गुड्स अॅन्ड सर्विस टॅक्स असून जो देशाच्या विविध प्रांताच्या खात्यात जातो, आयजीएसटी म्हणजे इंटीग्रेटेड गुड्स अॅन्ड सर्विसेस आहे. यंदाच्या वर्षात नोव्हेंबर महिन्यात जीएसटी मधून झालेली कमाई ही नोव्हेंबर 2020 पेक्षा 25 टक्के अधिक आहे. नोव्हेंबर 2019 सोबत तुलना केली असता हे कलेक्शन 27 टक्के अधिक आहे.