राजस्थान :  हुंडा (Dowry) न दिल्याने लग्नानंतर विवाहितेचा छळ केल्याच्या अनेक घटना आजवर घडल्या आहेत मात्र राजस्थान (Rajasthan) मध्ये एका गावात मुलीच्या कुटुंबाने हुंड्यामध्ये बाईक द्यायला नकार दिल्याने नवरदेवाने भर लग्नातुनच पळ घेतल्याची बाब समोर येत आहे. राजस्थानमधील बारन (Baran District) जिल्ह्यात घडलेल्या या प्रसंगानंतर या फरार नवरदेवाच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोरखपूर येथे हुंड्यासाठी सुनेला जिवंत जाळले, घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद (Video)

TOI च्या वृत्तानुसार  बारन जिल्ह्यात शुक्रवारी या लग्नसमारंभासाठी मंडप सजला होता. वराती, नातेवाईक सगळ्यांमध्ये आनंद पाह्यला मिळत होता पण इतक्यात 22 वर्षीय नवरदेवाने मुलीच्या कुटुंबाकडे हुंड्यात दुचाकी द्या अशी मागणी केली, ही मागणी मुलीच्या वडिलांनी फेटाळून लावल्यावर हा मुलगा थेट मंडपाबाहेर पळून गेला. यानंतर मुलीच्या कुटुंबाने हुंडा मागणी केल्याची तक्रार पोलिसांकडे केली. पण शनिवारी सकाळी हा पळून गेलेला नवरा परत घरी येताच दोन्ही कुटुंबांनी सहमतीने पुन्हा लग्न करण्याची तयारी दर्शवली. सासरच्या मंडळींनी हाकलल्यास, महिला कुठूनही दाखल करू शकते खटला: सर्वोच्च न्यायालय

दरम्यान पोलिसांनी तपास व हुंडा प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत चौकशी करणार असल्याची माहिती दिली आहे.