गोरखपूर येथे हुंड्यासाठी सुनेला जिवंत जाळले, घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद (Video)
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

गोरखपूर (Gorakhpur) येथे हुड्यांसाठी जिवंत जाळले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासरच्या मंडळींनी हुड्यांसाठी चक्क नव्या सुनेला जिवंत जाळल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. परंतु उपचारादरम्यान सुनेचा आपला जीव गमवावा लागला आहे.

टीव्ही 9 भारतवर्ष यांनी दिलेल्या बातमीनुसार, पूनम असे या मृत महिलेचे नाव आहे. पूनमला तिच्या सासरची मंडळी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन येण्याची वारंवार गळ घालत होते. त्यानंतर दोन्ही परिवारात याबद्दल तडजोडसुद्धा झाली तरीही सासरची मंडळी तिच्यावर हुड्यांवरुन छळ करत होते.(हेही वाचा-बेळगाव: कुत्र्यासोबत सेक्स करण्यासाठी बायकोवर दबाव; विकृत नवऱ्याला 10 वर्षांचा तुरुंगवास)

तर गेल्या दोन दिवसांपूर्वी पूनम हिचे याच कारणावरुन सासरच्या मंडळींसोबत भांडण झाले. रागाच्या भरात पूनम थोडावेळासाठी बाहेर आल्यानंतर घरात पुन्हा आली. मात्र त्यावेळी सासरच्या मंडळींनी तिच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत पेटवल्याचा प्रकार घडला. या सर्व प्रकारानंतर पूनम घरातून पेटलेल्या अवस्थेतच घराबाहेर आली. तर तेथील लोकांनी तिला पूनम हिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तिचा मृत्यू झाला असून सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.