पुढील आठवड्यात दिवळी (Diwali) येवून ठेपली आहे. प्रत्येक जण दिवाळ सणाच्या तयारीला लागला आहे. दिवाळी म्हणटलं की नवीन वस्तूंची खरेदी. त्यात दिवाळ सणाला सर्वांत जास्ती खरेदी केली जाते ती सोन्या चांदिची. दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे धनोत्रयादशी (Dhanotrayadashi). साडेतीन मुहूर्तापैकी एक. यादिवशी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. त्यात सोन्या चांदिची (Gold Silver) खरेदी म्हणजे सर्वोत्तम. धनोत्रदयादशीच्या मुहुर्तावर सोनं खरेदी करणं शुभ समजल्या जातं. तरी तुम्ही दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्या चांदिची खरेदी करण्याची योजना आखत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. कारण गेल्या आठवड्यात अगदी जेमतेम असलेले सोने चांदिच्या भावात आज अचानकचं मोठी वाढ झाली आहे. तर चांदिचे दर मात्र जैसेथे दिसुन आलेत. आठवड्याच्या शेवटी तर सोने चांदीचे दरात घसरण दिसून आली. त्यामुळे सोने खरेदीत वाढ होणे अपेक्षित होते. तरी जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचा दर काय
10 ग्रॅम चांदीचा दर आज 553 रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये (Trend) चांदीची किंमत 55,300 रुपये प्रतिकिलो होती. म्हणजेच चांदिच्या भावात फार मोठा फरक पडला नसला तरी सोन्याचे भाव मात्र गगनाला भिडले आहेत असं म्हणणं वावग ठरणार नाही. तर मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर आज 50,670 प्रति 10 ग्रॅम आहे आणि 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 46,450 रुपये आहे. (हे ही वाचा:- Bear Price Hike: मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! बिअरच्या किमतीत दरवाढ, बिअर खरेदीसाठी आता मोजावे लागणार अधिक शुल्क)
राज्यातील इतर मोठ्या शहरात म्हणजे पुणे, नाशिक, नागपूर येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 50,700प्रति 10 ग्राम आहे तर 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्राम भाव 45,480 रुपये आहे. तरी तुम्ही आज सोने चांदी खरेदीची योजना आखात असाल तर सर्वोत्तम. कारण दिवाळी दरम्यान सोने चांदिच्या भावात आणखीच वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.