दसरा (Dussehra 2020) सणाच्या निमित्ताने सोने लुटण्याची पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. या दिवशी आपट्याची पाने सोन्याचे प्रतीक समजून एकमेकांना सोने लुटले जाते. मात्र बरेज लोक आजही दस-याच्या निमित्ताने सोने खरेदी करतात. साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणा-या दसरा सणाच्या निमित्ताने अनेक शुभकार्य मार्गी लागतात. कारण असे म्हणतात की आजच्या दिवशी कोणतेही शुभकार्य केल्यास ते फलास जाते. त्याचप्रमाणे सोने खरेदी केल्यास लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर अखंड राहून सोन्यात, नोकरी धंद्यात वृद्धी होते. म्हणून आजचा सोन्याचा दर (Gold Rate Today) काय हे जाणून घेण्याची सर्वांनाचा उत्सुकता आहे.
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 51,200 रुपये इतका असून 22 कॅरेट सोन्याचा दर 50,200 रुपये इतका आहे. कालच्या दरापेक्षा आज सोन्याच्या दरात किंचितशी वाढ झालेली दिसते.
मुंबईसह पुणे, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता यांसारख्या महत्त्वांच्या शहरात काय आहे सोन्याचा आजचा दर:
शहर | 24 कॅरेट/प्रतितोळा | 22 कॅरेट/प्रतितोळा |
मुंबई | 51,200 रुपये | 50,200 रुपये |
पुणे | 51,200 रुपये | 50,200 रुपये |
चेन्नई | 51,270 रुपये | 47,110 रुपये |
हैदराबाद | 51,270 रुपये | 47,000 रुपये |
नवी दिल्ली | 52,890 रुपये | 49,400 रुपये |
बंगळूरू | 51,270 रुपये | 47,000 रुपये |
दस-याच्या शुभमुहूर्तावर सोन्याला चांगलीच झळाळी आली असली कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन मुळे यंदा सर्वांनाच आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. कोरोना व्हायरस संकटाचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर झाला आहे. त्यामुळे दरात चढ-उतार दिसत आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीवर त्याचा किंचितसा परिणाम होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र संकट कोणतेही असले तरी आपापल्या परीने हा सण साजरा करणे हे देशवासियांची संस्कृती ते कधीच मोडणार आहे याची खात्री देखील आहे.