Gold Rate on Akshay Tritiya 2021: अक्षय्य तृतीया दिनी सोन्या-चांदीला झळाळी, जाणून घ्या आजचे दर
Jewellery (Photo Credits: Pixabay)

Gold Rate on Akshay Tritiya 2021: साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त...या दिवशी कोणतेही शुभकार्य करणे चांगले मानले जाते. विशेषत: या दिवशी सोने खरेदी करण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. त्यामुळे यामुळे सोन्याचा दर काय असेल याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. अक्षय्य तृतीया (Akshay Tritiya) दिनी आज मुंबईत सोन्याचा दर (Gold Rate) प्रतितोळा 45,720 रुपये इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 44,720 रुपये इतका आहे. अक्षय्य तृतीयाच्या एक दिवस आधी म्हणजेच काल (13 मे) सोन्याच्या दरात जबरदस्त घसरण झाली होती. त्यामुळे सोन्याचा कालचा दर 45,720 रुपये प्रति तोळा इतका होता. तोच दर आज स्थिरावला आहे.

दरम्यान goodreturns ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आजचा चांदीचा दर 1 किलो सोन्याचा दर 70,500 रुपये इतका आहे. सोन्याचा दरात ना वाढ ना घट होऊन कालचा सोन्याचा भाव आजही कायम आहे.हेदेखील वाचा- Akshay Tritiya 2021: अक्षय तृतीयेच्या दिवशी 'या' शुभ मुहूर्तावर खरेदी करा सोनं; जाणून घ्या सविस्तर

मुंबईसह अन्य राज्यांतील सोन्याचा आजचा भाव (14 मे 2021)

शहर 24 कॅरेट/प्रतितोळा 22 कॅरेट/प्रतितोळा
मुंबई 45,720 रुपये 44,720 रुपये
चंदिगड़ 49,900 रुपये 45,900 रुपये
चेन्नई 49,090 रुपये 45,000 रुपये
हैदराबाद 48,560 रुपये 44,500 रुपये
नवी दिल्ली 49,900 रुपये 45,900 रुपये
बंगळूरू 48,560 रुपये 44,500 रुपये

दरम्यान भारतातील सध्याची कोरोना परिस्थिती पाहता अनेक शहरांमध्ये कडक लॉकडाऊन आहेत. त्यामुळे बाहेर पडून सोनं खरेदी करणं शक्य नसल्याने अनेक ज्वेलर्स कडून यंदा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ऑनलाईन सोनं खरेदीचे (Online Gold Purchase) पर्याय देण्यात आले आहेत. मग यंदा तुमचा देखील सोनं खरेदीचा विचार असेल तर ही अक्षय्य तृतीयेची संधी दवडू नका.

टाटाच्या तनिष्क कडून अक्षय्य तृतीयेला ऑनलाईन खरेदी दरम्यान सोनं आणि डायमंड ज्वेलरीच्या घडणावळीवर 25% सूट आहे.

कल्याण ज्वेलर्सने देखील अक्षय तृतीयेनिमित्त 15 हजारांवरील किंमतीच्या दागिन्यांची खरेदी आणि कार्ड पेमेंट केल्यास 5% सूट जाहीर केली आहे.

वामन हरी पेठे ज्वेलर्स कडूनही सध्या डायमंड ज्वेलरीच्या घडणावळीवर 50% पर्यंत सूट दिली जात आहे.

जोयालूसका मध्ये 16 मे पर्यंत 50 हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर 22 कॅरेट सोन्याचं 200 एमजी चं कॉईन मोफत दिलं जाणार आहे. हीच ऑफर डायमंड वर देखील आहे. तर एसबीआय च्या ग्राहकांना 5% कॅशबॅक ऑफर आहे