प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Fuel Prices on 15th May: पश्चिम बंगालच्या निवडणूका संपताच भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात जबरदस्त वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. नवी दिल्लीसह (New Delhi) अनेक महत्त्वांच्या शहरात पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Rate) किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. तर महाराष्ट्रात तर अनेक जिल्ह्यांत पेट्रोलने शंभरी पार केली. आजच्या ताज्या अपडेट्सनुसार, मुंबईत (Mumbai) पेट्रोलचे दर स्थिरावले असून आजही पेट्रोलचा दर 98.65 रुपये प्रति लीटर इतका आहे. तर नवी दिल्लीत पेट्रोलचा दर 92.34 रुपये प्रति लीटर इतका आहे.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पेट्रोलने शंभरी पार केली आहे. बुलढाण्यामध्ये पेट्रोलचा दर 100.22 रुपये प्रति लीटर, तर नांदेडमध्ये पेट्रोल 100.76 पैसे इतका आहे.हेदेखील वाचा- Petrol-Diesel Rate Today: महाराष्ट्रात इंधन दरवाढ सुरुच, जाणून घेऊया मुंबई, पुणे, सिंधुदुर्गासह अन्य जिल्ह्यांतील आजचे दर

पाहूयात आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

शहर पेट्रोल (प्रति लीटर रुपये)  डिझेल (प्रति लीटर रुपये)
मुंबई 98.65 90.11
दिल्ली 92.34 82.95
कोलकाता 92.44 85.79
नांदेड 100.76 90.79
परभणी 100.62 90.64
सिंधुदुर्ग 100.15 90.21
चेन्नई 94.14 87.89

पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही SMS च्या माध्यमातून सुद्धा तपासून पाहू शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार तुम्हाला RSP आणि तुमच्या शहराचा कोड लिहून 9224992249 वर पाठवावा लागणार आहे. प्रत्येक शहराचा कोड क्रमांक वेगळा असून तुम्हाला तो आयओसीएलच्या वेबसाइटवर मिळू शकतो.