Petrol-Diesel Rate Today: महाराष्ट्रात इंधन दरवाढ सुरुच, जाणून घेऊया मुंबई, पुणे, सिंधुदुर्गासह अन्य जिल्ह्यांतील आजचे दर
पेट्रोल, डिझेल Photo Credits: PTI)

Petrol-Diesel Rate Today: महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सतत वाढ होत असल्याचे चित्र आढळून आले आहे. दरम्यान काही जिल्ह्यात पेट्रोलच्या दराने शंभरचा टप्पा पार केला आहे. goodreturns नुसार, मुंबईत (Mumbai) पेट्रोलचा आजचा दर 98.65 रुपये प्रति लीटर इतका असून डिझेलचा दर 90.11 रुपये प्रति लीटर इतका आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पेट्रोलने शंभरी गाठली आहे. अमरावती, बीड, गोंदिया, जालना, नांदेड, परभणी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ या जिल्ह्यांत पेट्रोल शंभरच्या पार गेले आहे.

तर महाराष्ट्रात डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे. राज्यांत अनेक जिल्ह्यांत डिझेल 90 च्या पार गेले आहे. ठाण्यामध्ये डिझेलचे दर सर्वात कमी म्हणजे 88.26 रुपये प्रति लीटर आहे.हेदेखील वाचा- Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींपासून सर्वसामान्यांना दिलासा; जाणून घ्या आजचे तुमच्या शहरात नवीन दर

पाहूयात मुंबई, पुणे, सिंधुदुर्गासह महत्त्वाच्या जिल्ह्यांतील आजचे दर

शहर पेट्रोल (प्रति लीटर रुपये)  डिझेल (प्रति लीटर रुपये)
मुंबई 98.65 90.11
पुणे 99.13 87.92
ठाणे 98.18 87.82
नांदेड 100.22 90.27
परभणी 100.59 90.61
सिंधुदुर्ग 100.15 90.21
रत्नागिरी 100.1 90.14
बीड 100.08 90.14
अमरावती 100.01 90.08
गोंदिया 100.06 90.13
जालना 100.15 90.19
लातूर 100.11 90.16

दरम्यान काल (13 मे) महाराष्ट्रातील नांदेडमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 100.54 रुपये होती. त्याचप्रमाणे राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पेट्रोल 100.97 रुपये तर गंगानगरमध्ये प्रति लिटर 102.96 रुपयांवर पोचले आहे. त्याशिवाय अनुपपूर, नगरबंध, रीवा आणि छिंदवाडा मधील पेट्रोलची किंमत अनुक्रमे 102.66 रुपये, 103.31 रुपये, 102.30 रुपये आणि 101.93 रुपये प्रतिलिटर झाली आहे.