Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींपासून सर्वसामान्यांना दिलासा; जाणून घ्या आजचे तुमच्या शहरात नवीन दर
Petrol Price In India | Representational Image | (Photo Credits: PTI)

Petrol-Diesel Price: देशात सध्या तीन राज्यांतील अनेक जिल्ह्यात पेट्रोलच्या किंमती 100 रुपयांच्या पुढे गेल्यानंतर आज दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. इंडियन ऑईलच्या अधिकृत संकेतस्थळावरून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे की, आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मे महिन्यात तेलाच्या किंमतीत एकूण 7 दिवस वाढ करण्यात आली. बुधवारी तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोलची किंमत 19 ते 26 पैसे प्रतिलिटर आणि डिझेल 24 ते 28 पैसे प्रतिलिटरपर्यंत वाढविली होती.

आदल्या दिवशी झालेल्या वाढीनंतर आर्थिक राजधानी मुंबईतही पेट्रोलची किंमत प्रति लिटर 100 रुपयांकडे जात असल्याचे दिसून आले. महाराष्ट्रातील नांदेडमध्ये पेट्रोलची किंमत आज प्रतिलिटर 100.54 रुपये आहे. त्याचप्रमाणे राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पेट्रोल 100.97 रुपये तर गंगानगरमध्ये प्रति लिटर 102.96 रुपयांवर पोचले आहे. त्याशिवाय अनुपपूर, नगरबंध, रीवा आणि छिंदवाडा मधील पेट्रोलची किंमत अनुक्रमे 102.66 रुपये, 103.31 रुपये, 102.30 रुपये आणि 101.93 रुपये प्रतिलिटर झाली आहे. (वाचा - Central Vista Project: काँग्रेससह12 विरोधी पक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र; अनावश्यक खर्च टाळून सर्व निधी कोरोना व्हायरस महामारी निवारासाठी खर्च करण्याची मागणी)

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत सातत्याने वाढत आहे. याशिवाय देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलवर भारी कर लादला जातो. तसेच इंधनाच्या वाहतुकीच्या खर्चाचा भारही ग्राहकांवर टाकला जातो.

पेट्रोल आणि डिझेलच्या आजच्या किंमती -

आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल न झाल्याने राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 92.05 रुपये आणि डिझेलची किंमत प्रतिलिटर 82.61 रुपये आहे. त्याचप्रमाणे मुंबईत आज पेट्रोलची किंमत 98.36 रुपये तर डिझेलची किंमत 89.75 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकातामध्ये आपल्याला प्रतिलिटर पेट्रोलसाठी 92.16 रुपये आणि डिझेलवर 86.45 रुपये द्यावे लागतील. चेन्नईत आज पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 93.84 रुपये आणि डिझेलची किंमत 87.49 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचली आहे.