Central Vista Project: काँग्रेससह12 विरोधी पक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र; अनावश्यक खर्च टाळून सर्व निधी कोरोना व्हायरस महामारी निवारासाठी खर्च करण्याची मागणी
PM Narendra Modi | (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीची दुसली लाट (Corona Second Wave) देशात धुमाकूळ घालत आहे. नागरिकांचे प्राण मोठ्या प्रमाणावर जात असल्याने विरोधी पक्षाने केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्र सरकारचा प्रमुख विरोधक असलेल्या काँग्रेस पक्षासह इतर 12 पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात केंद्र सरकारला सूचना वजा सल्ला दिला आहे. केंद्र सरकारने कोरोना काळात बेजबाबदार वर्तन न करता कोरोना महामारी अत्यंत गांभीर्याने घ्यावी असे म्हटले आहे. अन्यथा देशाची आर्थिक स्थिती गंभीर तर बनेलच. परंतू,त्यासोसबतच देशाच्या प्रगतीलाही मोठा फटका बसू शकतो, असा इशारा या पत्रात दिला आहे. देशातील कोरोना व्हायरस संक्रमन रोखण्यासाठी लसीरणावर (Corona Vaccination) भर दिला पाहिजे. त्यासाठी अर्थसंकल्पात निर्धारीत केलला 35000 कोटी रुपये खर्च करण्यात यावेत असे या पक्षात म्हटले आहे.

काँग्रेससह इतर 12 राजकीय पक्षांनी पत्राद्वारे मागणी केली आहे की, केंद्र सरकारने सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट तातडीने रोखला जावा. या प्रोजेक्टसाठी वापरण्यात येणारा पैसा देशातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजन आणि कोरोना लसीकरणासाठी खर्च करावा असे म्हटले आहे. पीएण केँर फंडात जमा झालेले पैसेही ऑक्सीजन, औषधे आणि मेडीकल उपकरणे खरेदी करण्यासाठी वापरावेत असे विरोधकांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या आपल्या पत्रात म्हटले आहे. (हेही वाचा, Mumbai: मुंबईमध्ये येणार Covid-19 लसीकरणाला वेग; BMC खरेदी करत आहे तब्बल 1 कोटी लसीचे डोस, IS Chahal यांची माहिती )

विरोधी पक्षांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीचा फटका बसल्याने बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे हाताला काम नसलेल्या देशातील बेकार तरुणांना प्रतिमहिना 6 हजार रुपये देण्यात यावेत. केंद्रीय गोदांमध्ये जे धान्य पडून आहे ते गरजूंना मोफत वाटप करावे. त्यासोबतच देशात केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे केंद्र सरकारने तातडीने रद्द करावेत. शेतकऱ्यांना कोरोनापासून वाचवावे, असेही विरोधकांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.