सोन्या-चांदीच्या किंमतीत शुक्रवारी पासून जबरदस्त घट होत आहे. सोन्याच्या किंमती शुक्रवारी 1097 रुपये प्रति 10 ग्रॅमने खाली आल्या आहेत. सोन्याच्या किंमती कमी झाल्यानंतर राजधानी दिल्लीत सोन्याचे दर आज 42,600 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या अनुसार, गुंतवणूकदार अन्य ठिकाणी वळत असून आणि रुपयात मजबूती दिसून आल्याने सोन्याचे दर कमी झाले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसात सोन्याचे दर 43,697 रुपये झाले होते.
सोन्यासह चांदीचे भाव सुद्धा कमी झाले आहेत. चांदीच्या किंमती शुक्रवारी 1574 रुपये खाली आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना प्रति किलोग्रॅम चांदीसाठी 44,130 रुपये मोजावे लागणार आहेत. गुरुवारी चांदीचे दर 45,704 रुपये प्रति किलोग्रॅम होते.एचडीएफसी सिक्युरिटीचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी असे सांगितले आहे की, शुक्रवारी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1000 रुपयांपेक्षा अधिक घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढत 1584 डॉलर प्रति औंस आणि चांदीचे दर कमी होत 15.65 डॉलर प्रति औंसवर स्थिर झाला होता.(Gold Shopping: सोने खरेदी करत असाल तर हा नवा नियम नक्की वाचा; बनावट सोने ओळखणे आता होणार सोपे)
भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) ही देशातील एकमेव एजन्सी आहे ज्यांना सोन्याचे दागिने हॉलमार्किंगला मान्यता आहे. आता नव्या नियमानुसार 14 कॅरेट, 18 कॅरेट आणि 22 कॅरेट असं सोन्यासाठी हॉलमार्किंग निश्चित करण्यात आलं आहे. सध्या आपल्या देशात ग्राहकांच्या इच्छेनुसार हॉलमार्क दागिणे दिले जातात. परंतु नवा नियम लागू झाल्यानंतर सराफांना हॉलमार्क असलेले दागिने विकणेच बंधनकारक असेल. यामुळे दागिण्यांच्या बनावट दागिने विकून ग्राहकांची फसवणूक थांबणार आहे व ग्राहकांना यांचा फायदा होणार आहे.