दिल्लीत आज सोन्याचे भाव वाढले तर चांदीच्या भावात घसरण
प्रतिकात्मक फोटो | (Photo credit: archived, edited, representative image)

दिल्लीत सोमवारी (25 मार्च) सोन्याच्या भावात वाढ झाली असून सराफ बाजारात चांदीच्या भावात घसरण दिसून आली आहे. तसेच सोन्याचा आजचा दर 170 रुपये कमी होऊन 33,220 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. सोन्याच्या दरामध्ये जागितक कारणांमुळे वाढ झाली आहे.

तर चांदीचे भाव 70 रुपयांनी कमी होऊन 33,220 रुपये झाला आहे. इंडस्ट्रियल यूनिट आणि नाणे निर्मात्यांनी चांदीची मागणी केली. ट्रेडर्सच्या मते, स्थानिक ज्वेलर्संनी अधिक खरेदी केल्याने त्याचे दर वाढले आहेत.जागतिक स्तरावर सोन्याचे भाव 0.19 टक्क्यांनी वाढून 1316.90 डॉलर प्रति औंस झाला आहे. तर चांदीचे दर 0.12 टक्क्यांनी वाढून 15.54 डॉलर प्रति औंस झाला आहे.

त्याचसोबत दिल्ली सराफ बाजारात 99.9 आणि 99.5 टक्के शुद्ध सोन्याचे भाव क्रमश: 170-170 रुपयांनी वाढले असून 33,220 रुपये आणि 33,050 रुपये प्रति 10 ग्रॅम यापद्धतीने झाले आहे. तर शुक्रवारी सोन्याचे भाव 80 रुपयांनी वाढला होता. दुसरीकडे चांदीचे भावात 70 रुपयांनी घसरण झाली आहे.