आज सोन्याचे भाव घसरले, ग्राहकांना दिलासा
सोन्याचे दर (फोटो सौजन्य-ट्वीटर)

सोन्याच्या भावात आज मोठी घसरण दिसून आली आहे. गेल्या 8 दिवसापासून सोन्याचे भाव घसरत आहेत. तर आज 8 व्या दिवशी सोन्याचे भाव 1580 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त झाले आहे. दिल्ली मधील सराफ बाजारात आज सोन्याचे भाव 360 रुपयांनी कमी होऊन 33,070 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.

त्याचसोबत चांदीच्या भावातही घसरण झाली आहे. चांदीचा आजचा भाव 520 रुपयांनी कमी होऊन 38980 रुपये प्रति किलो झाला आहे. सोने आणि चांदीच्या भावात कमजोर जागतिक संकेतामुळे भाव घसरले असल्याचे सांगितले जात आहे. ट्रेडर्सच्या म्हणण्यानुसार, स्थानिक ज्वेलर्स आणि कमजोर जागतिक संकेतांमुळे सोन्याचे भाव कमी झाले आहेत. जागतिक पातळीवर सोन्याचा भाव 1284.77 डॉलर प्रति औंस अशा पद्धतीने कारभार केला जात होता. तर चांदीचा भाव 15.06 प्रति डॉलर औंस राहिला आहे.

दिल्लीमध्ये 99.9 शुद्धता असलेल्या सोन्यात 360 रुपयांची घसरण झाली असून 33070 रुपयांवर त्याचे भाव पोहचले आहेत. तर 99.5 टक्के शुद्ध असलेल्या सोन्याचे भाव ही 360 रुपयांनी कमी झाले असून 32,99- रुपयांवर ट्रेड करत आहे.