गोव्यात एका तरुणाकडून तब्बल 1 कोटी 99 लाख 92 हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. हा तरुण नवीन पनवेल येथील रहिवासी असून लवू चव्हाण असे त्याचे नाव आहे. हा तरुण करमळी ते लोकमान्य टीळक टर्मिनस उन्हाळी विशेष गाडीतून प्रवास करत होता. त्याच्याकडे जून्या नोटा आढळून आल्याने थिवी रेल्वे स्थानकात कारवाई करण्यात आली.
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, रेल्वे पोलिसांनी बॅग उघडून दाखवण्यास सांगितल्यावर त्याने नकार दिला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी ती बॅग उघडली. तेव्हा त्यात जवळपास 2 कोटी रुपयांच्या 1 हजार आणि 500 च्या नोटा आढळून आल्या. यात 1 हजारच्या 19 हजार 985 नोटा तर 500 रुपयांच्या 14 नोटा होत्या. (500 रुपयांच्या नोटांचे पडतायत तुकडे, सांगली जिल्ह्यातील विटा येथील प्रकार)
रेल्वे पोलिसांनी पुढील कारवाईसाठी लवू चव्हाण याला स्थानिक पोलिसांच्या हवाली केले आहे.