गोवा येथे रात्री फिरायला गेलेल्या महिलेवर बलात्कार, आरोपींना पोलिसांकडून अटक
Rape Case | (Photo credit: archived, edited, representative image)

गोवा (Goa) येथे रात्री मित्रांसोबत फिरायला गेलेल्या महिलेवर तिच्याच मित्रांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेने पोलिसात तक्रार केल्यानंतर आरोपी मित्रांना अटक करण्यात आली आहे.

पणजीमध्ये आपल्या मित्रांसोबत एक 40 वर्षीय महिला रात्री लॉन्ग ड्राईव्हसाठी निघाली होती. त्याचवेळी तिच्यासोबत असलेल्या मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडित महिलेला तेथील नजीकच्या किनारपट्टीवर फेकून दिले.

(बुलढाणा: 38 वर्षे पाठपुरावा करुनही मिळाले नाही विज कनेक्शन; शेतकऱ्याकडून भर कार्यक्रमात आत्महत्येचा प्रयत्न)

या प्रकरणी महिलेने पोलिसात मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक केली. तसेच पीडित महिलेला जखमा झाल्या असून तिच्यावर पणजीमधील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपींना तुरुंगाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.