गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Photo Credits: PTI/File)

गोव्याचे (Goa) मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचे रविवारी (17 मार्च) निधन झाले आहे. तर शनिवार पासून पर्रिकर यांची प्रकृती खालावली होती. याबाबत भाजप (BJP) आमदार मायकल लोबो (Michael Lobo) यांनी काल सांगितले. मात्र आज पर्रिकर यांची स्थिती अधिकच खालावली गेल्याने त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे. मनोहर पर्रीकर यांचा बळी घेणारा 'स्वादुपिंडाचा कॅन्सर' World’s Toughest Cancer म्हणून ओळखला जातो, या कॅन्सरमध्ये रुग्ण बचावण्याची शक्यता अत्यल्प का असते?

पर्रिकर गेली कित्येक दिवस मृत्यूशी झुंज करत होते. तसेच आजारपणातही त्यांनी आपली भुमिका बजावताना दिसून आले होते. मात्र आज अखेरचा श्वास घेतल्याने देशात त्यांच्या बद्दल हळहळ व्यक्त होत आहे.(हेही वाचा-गोवा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती खालावली; गोव्यात राजकीय घडामोडींना वेग)

स्वादुपिंडाच्या आजाराने गेली वर्षभर पर्रिकर आजारी होते. तसेच अमेरिका, मुंबई आणि दिल्लीतही त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. मात्र गेली चार दिवस घरी उपचार घेत होते. परंतु पर्रिकर यांच्या दु:खद निधनाने शोककळा पसरली आहे.

पर्रिकर 2002 मध्ये पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर मोदी सरकारमध्ये त्यांनी संरक्षणमंत्री पदाचा कार्यभार स्विकारला होता. तर केंद्रात संरक्षणमंत्र्यांची भुमिका बजावताना त्यावेळी सर्जिकल स्ट्राईकसारखा महत्वाचा निर्णय घेण्यात आला होता.