गोवा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती खालावली; गोव्यात राजकीय घडामोडींना वेग
File image of Goa CM Manohar Parrikar | (Photo Credits: IANS)

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांची प्रकृती खालावली आहे. काल (शनिवार, 16 मार्च) भाजपा आमदार मायकल लोबो यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. तसंच पर्रीकरांवर उपचार सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदरांची तात्काळ  बैठक बोलवण्यात आली. पर्रीकरांची प्रकृती खालावल्यामुळे हे सरकार बरखास्त करुन आम्हाला सत्तास्थापनेची संधी द्यावी, असे काँग्रेसने पत्र लिहून म्हटले आहे.

मायकल लोबो यांनी सांगितले की, "भाजपचे गोव्यातील प्रतिनिधित्व बदलणार नाही. जोपर्यंत पर्रीकर येथे आहेत, तोपर्यंत गोव्याचे मुख्यमंत्री तेच राहतील आणि त्यांना त्यांचे स्थान बदलण्याची कोणीही मागणी केलेली नाही. आम्ही त्यांची प्रकृती सुधारावी म्हणून प्रार्थना करत आहोत. मात्र त्यांच्या प्रकृतीमुळे काही झाल्यास नवीन मुख्यमंत्री देखील भाजपचा असेल." गोव्यात काँग्रेसचे सरकार येणार असल्याचा दावा, तर पर्रिकर यांच्या सरकारला बहुमत मिळणार नाही

तसंच पर्रीकराची खालावलेली प्रकृती लक्षात घेऊन भाजपाने मुख्यमंत्री पदासाठी भाजपाने नव्या पर्यायाचा शोध सुरु केला आहे. तसंच कोणत्याही आमदाराने पुढील चार दिवस गोव्याबाहेर जावू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.