Arrests | (Photo credit: archived, edited, representative image)

या महिन्याच्या सुरुवातीला उत्तर दिल्लीतील चांदनी चौक परिसरात भारतातील फ्रान्सचे राजदूत थियरी माथौ यांचा मोबाईल फोन चोरल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी बुधवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हरवलेला फोन परत मिळाला आहे. (हेही वाचा  -  Indian Embassy Official Death: वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, यू. एस. सीक्रेट सर्व्हिसकडून तपास सुरु )

“भारतातील फ्रान्सचे राजदूत डॉ. थियरी मॅथौ यांनी 20 ऑक्टोबर रोजी चांदनी चौक परिसरातील जैन मंदिराजवळ आपला मोबाईल हरवल्याची ई-तक्रार दाखल केल्यानंतर चार जणांना अटक करण्यात आली आहे. मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे,” असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. एएनआय या वृत्तसंस्थेचे वृत्त आहे.

पाहा पोस्ट  -

चांदणी चौकातील जैन मंदिराजवळ आपला मोबाईल हरवल्याची ई-फिर्याद थियरी माथौ यांनी दाखल केली होती. 20 ते 25 वर्षे वयोगटातील चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी हे ट्रान्स-यमुना परिसरातील रहिवासी असून पुढील तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.