(Photo Credits: AIR/ Twitter)

सिंगापूर (Singapore) पाठोपाठ आता भारतीयांना फ्रांस (France) मध्ये यूपीआय (UPI) चा वापर करत भारतीय रूपयांमध्ये व्यवहार करता येणार आहे. फ्रांस दौर्‍यादरम्यान नरेंद्र मोदींनी ही मह्त्त्वाची करत भारतीयांना गिफ्ट दिलं आहे. रिटेल पेमेंट्स मध्ये आता फ्रांसमध्ये भारतीय यूपीआय वापरू शकतील. फ्रांस हा पहिला युरोपीय देश आहे ज्यांनी भारतीय यूपीआय सुविधेला त्यांच्या देशात मंजूरी दिली आहे. जून 2022 ,मध्ये NCPI ने फ्रांसच्या Lyra Network सोबत MoU करत तेथे UPI आणि RuPay वापरण्यासाठी मह्त्त्वाचं पाऊल उचललं आहे.  त्यामुळे भारतीयांना आता पॅरिस मध्ये आयफेल टॉवर मध्येही बुकिंग भारतीय रूपये वापरून यूपीआय द्वारा करता यईल. ही सुविधा लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

India-France UPI Agreement चा अर्थ काय?

भारत-फ्रांस मध्ये झालेल्या या नव्या करारामध्ये भारतीय पर्यटक आता UPI चा वापर करत रूपे पेमेंट करू शकतील. पूर्वी भारतीयांना क्रेडीट, डेबिट कार्ड्स वापरण्याची मुभा होती. पण आता क्यूआर कोड स्कॅन करण्याचा किंवा यूपीआय आयडी वापरण्याचा नवा पर्याय मिळाला आहे.

फ्रांस-भारत मधील करारानुसार, आता फ्रांस मध्ये डिजिटल पेमेंटला चालना मिळणार आहे. तसेच forex reserves वाचणार आहेत कारण भारतीय आता रूपयांमध्ये व्यवहार करू शकतील.

मार्क अप फी वाचणार

जेव्हा भारतीय परदेशामध्ये क्रेडिट किंवा डेबिट कार्ड्सचा वापर करतात तेव्हा पेमेंट वर प्रत्येक बॅंका कार्डस नुसार, 0.99 ते 3.5% मार्क अप चार्ज लावतात. पण आता UPI मध्ये हा मार्क अप चार्ज आकारला जाणार नाही कारण ग्राहक रूपयांमध्ये व्यवहार करतील पूर्वी जो परदेशी चलनात होत होता. ग्राहकांचे यामुळे पैसे वाचणार आहेत. India-Singapore Linkage UPI: भारत आणि सिंगापूर डिजिटल पेमेंट सिस्टमला जोडण्याचे पंतप्रधानांनी स्वागत केले .

परदेशात भारतीय कुठे-कुठे वापरतात डिजिटल पेमेंट

फेब्रुवारी 2023 पासून भारतीय यूपीआय आणि सिंगापूरच्या PayNow मध्ये करार झाल्याने भारतीयांना सिंगापूर मध्येही यूपीआय वापरता येते. PhonePe देखील सिंगापूर, यूएई, भूतान, नेपाळ, मॉरिशिएस मध्ये वापरता येते. यामध्ये क्यु आर कोडच्या माध्यमातून व्यवहार करता येतो.