विश्व हिंदू परिषदेचे (Vishwa Hindu Parishad) पूर्व अंतरराष्ट्रीय अध्यक्ष आणि रामजन्मभूमीच्या आंदोलनामध्ये (Ram Janmabhoomi agitation) मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे विष्णु हरि दालमिया (Vishnu Hari Dalmia) यांचे दिल्लीमध्ये आज निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी आज दिल्लीमध्ये निधन झाले. दीर्घ आजारपणामध्ये दालमिया यांचे निधन झाले.गोल्फ लिंक येथील राहत्या घरी दालमिया यांनी अंतिम श्वास घेतला.
विष्णु हरि दालमिया 1979 सालपासून विश्व हिंदू परिषदेसोबत जोडलेले आहेत. उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष नंतर 2005 पर्यंत अंतरराष्ट्रीय अध्यक्ष होते. रामजन्मभूमी आंदोलनामध्ये प्रमुख दिशादर्शक असल्याने त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना आहे. अयोध्या जमिन वाद: सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली, खंडपीठातील एका न्यायाधिशाची माघार
रामजन्मभूमी आंदोलनामध्ये विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अशोक सिंघल, आचार्य गिर्राज किशोर यांच्यासोबत महत्त्वाची कामगिरी केली आहे. देशातील प्रमुख उद्योगपतींमध्ये डालमियांची गिनती होते. आज संध्याकाळी चार वाजता निगम बोध घाट परिसरात दालमिया यांच्यावर अंतिमसंस्कार होणार आहेत.