Racism in Oxford: ऑक्सफोर्ड वर्णभेद प्रकरणी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची प्रतिक्रिया, 'गरज पडल्यास भारत इंग्लंडसोबत चर्चा करेन'
Rashmi Samant. (Photo Credits: Twitter)

ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी (University of Oxford) विद्यापीठात भारतीय विद्यार्थीनी रश्मी सामंत (Rashmi Samant) हिने विद्यार्थी संघटनेचा दिलेला राजीनामा हा राज्यसभा सभागृहात गाजला. रश्मी सामंत यांना वर्षद्वेशाचा (Racism in Oxford) सामना करावा लागला आहे. भाजप खासदार अश्विनी वैष्णव यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सभागृहात हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सांगितले की, भारत वर्षद्वेशाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करु शकत नाही. त्यामुळे गरज पडल्यास भारत इंग्लंडसोबत या विषयावर चर्चा करेन.

रश्मी सामंत यांना गेल्या महिन्यात विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेतून अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. वर्णद्वेशातून त्यांना राजीनामा द्यावा लागल्याची चर्चा आहे. ओडीशाच्या भाजप खासदारांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित करत म्हटले की, मी सभागृहाचे लक्ष एका गंभीर विषयाकडे म्हणजेच वर्षद्वेशाच्या मुद्द्याकडे वेधू इच्छितो. असे वाटते आहे की, अद्यापही भारतीयांकडे वर्णद्वेशी नजरेने पाहिले जात आहे. प्रामुख्याने यूनायटेड किंग्डम मध्ये. 22 वर्षीय विद्यार्थीनी रश्मी सामंत, जिला नुकताच ऑक्सफर्ड विद्यापीठात वर्णद्वेशाच्या कारणावरुन राजीनामा द्यावा लागला. सामंत यांच्याबाबत घडलेल्या घटनेतून वर्षद्वेशाचे गांभीर्य पुन्हा एकदा पुढे आले आहे. सामंत या ऑक्सफोर्ड विद्यार्थी संघटनेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा आहेत. (हेही वाचा, Anti Apartheid Movement: वर्णभेद विरोधी लढ्याला Amazon कंपनीकडून 1 कोटी डॉलरची मदत)

खासदार अश्विनी वैष्णव यांनी म्हटले की, रश्मी सामंत यांच्या भिन्नतेचा सन्मान केला जायला पाहिजे होता. परंतू, त्या ऐवजी त्यांच्यावर अन्याय झाला. त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला.त्यांच्यावर इतक्या प्रमाणावर हल्ला करण्या आला की, त्यांच्या हिंदू असण्यावरुन आणि आई-वडीलांच्या हिंदू अस्थेवरुनही टीप्पणी करण्यात आली. जर ऑक्सफर्डसारख्या ठिकाणी अशा घटना घडत असतील तर जगभरात कसा संदेश जाईल.

दरम्यान, कर्नाटक राज्यातील उडुपी येथून येत असलेल्या रश्मी सामंत याची अध्यक्ष पदासाठी निवड झाली तेव्हा त्यांच्या सोशल मीडयावरील काही जुन्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. त्यांच्यावर खूप टीका झाली. 2017 मध्ये जर्मनीच्या बर्लिन होलोकॉस्ट मेमोरियल येथील भेटीदरम्यान हॉलोकॉस्टवर एक टिप्पणी आणि मलेशिया मध्ये टिपण्यात आलेली छायाचित्र यांवर 'चिंग चँग' यांसारखी टप्पणी केरण्यात आली होती. सामंत यांनी LGBTQ+ कॅम्पेनमध्ये महिला आणि ट्रान्स महिला यांच्यातील भेद जाहीर केला होता. तेव्हाही त्यांच्यावर टीका करण्या आली होती. त्यांचा राजीनामा मागण्यात आला होता.