अमेरिकेच्या एफडीए (US FDA) कडून भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोवॅक्सिनला (Covaxin) आपत्कालीन मंजुरीसाठी अमेरिकेत अर्ज फेटाळला आहे. मात्र त्याचा प्रभाव भारतात होणार नसल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. यामध्ये अमेरिकेच्या निर्णयाचा आम्ही आदर राखतो असे देखील केंद्र सरकार कडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान भारतामध्ये काल 'कोवॅक्सिन' च्या वापराला अमेरिकेत मंजुरी मिळाली नसल्याचं सांगितल्यानंतर नीती आयोगाच्या वी के पॉल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'प्रत्येक देशाची एक रेग्युलेटरी यंत्रणा असते आम्हांला आशा आहे की अमेरिकेला आवश्यक माहितीची पूर्तता लवकरच लस निर्मात्यांकडून केली जाईल.' असे ते म्हणाले.
'प्रत्येक रेग्युलेटर यंत्रणांमध्ये काही नियमावली असते. काही बाबतीत ती सर्व स्तरांवर सारखी आहे तर काही ठिकाणी ती वेगवेगळी असू शकते. सायंटिफिक फ्रेमवर्क हे सारखेच असतात पण कॉन्टेक्स्ट मध्ये बदल होत असतात. काही ठिकाणी सायंटिफिक कन्सिडरेशन अधिक महत्त्वाची असतात तेथे असे निर्णय घेतले जातात आपल्याकडे मॅन्युफेक्चरिंग स्ट्रॉंग असल्याने असे निर्णय घेतले जातात.' असे देखील वी. के पौल यांनी स्पष्ट केले आहे.
कोवॅक्सिनच्या फेझ 3 चे रिपोर्ट्स येत्या 7-8 दिवसांत समोर येण्याची शक्यता आहे. हा डाटा DCGI ला दिलेल्या माहितीच्या पलिकडील असेल. भारतामध्ये सध्या लसीकरणाचा कार्यक्रम उत्तम सुरू आहे आणि तो तसाच राहिल. अमेरिकेच्या निर्णयाचा सध्य भारतात कोणताच प्रभाव दिसणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान आता भारतात कोविड ची दुसरी लाट ओसरत असताना कोविड 19 लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. येत्या 21 जून पासून केंद्र सरकार 18 वर्षांवरील सार्यांना मोफत लस उपलब्ध करून देणार आहे.