Farmers Protest: शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या दरम्यान सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारचे तीन कृषी विधेयक लागू करण्यासाठी स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी हा मोठा निर्णय जाहीर केला आहे. सुप्रीम कोर्टाने सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये गेल्या काही काळापासून बैठका सुरु आहेत. परंतु त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी कृषी कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.
सुप्रीम कोर्टाने तिन्ही कृषी कायद्यावर पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. तसेच आणखी एक कमेटीची तयार करण्याचे आदेश दिले आहेत. ही कमेटी सरकार आणि शेतकऱ्यांच्या मध्ये असलेला वाद समजून घेईल आणि सुप्रीम कोर्टाला रिपोर्ट देईल. या कमेटीमध्ये एकूण चार लोक असतील जे ही समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करतील.(SC on Farm Laws: शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात सरकाराच्या भुमिकेबद्दल सुप्रीम कोर्टाची नाराजी)
Tweet:
#FarmLaws: Supreme Court forms a committee to hold talks https://t.co/eIXr3WcNvA
— ANI (@ANI) January 12, 2021
दरम्यान, दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलनाचा मंगळवारी 48 वा दिवस आहे. राजधानी दिल्लीत अद्याप आपल्या मागण्यांवर कायम असलेल्या शेतकऱ्यांच्या संघटनांनी म्हटले की, कोणत्याही कमेटी मध्ये हे प्रकरण घेऊन जाणे त्यांना मान्य नाही.