मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकर्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरूच आहे. दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमेवर शेतकरी 108 दिवसांहून अधिक काळ प्रदर्शन करीत आहेत. सध्या चालू असलेल्या चळवळीमुळे आता सिंघु आणि टिकरी सीमेला मिनी पिंड म्हणून संबोधले जात आहे. शेतकरी निषेध करत असताना या ठिकाणी सलून, जिम उभी राहिली. आता या ठिकाणी पक्की विटांची घरे उभारत आहेत. सिंघु सीमेवर वीटांच्या घरांचे बांधकाम सुरू आहे. सध्या फक्त एक भिंत उभारली गेली आहे, त्यावर कायमस्वरुपी छप्परदेखील लावले जाईल.
सिंघू सीमेवर अशी 3 ते 4 पक्की घरे बांधली जात आहेत. येथे 10 मार्चपासून बांधकाम सुरू झाले आहे. याक्षणी घरांच्या भिंती उभा असल्याचे दिसत आहे. शेतकरी नेते मनजित राय म्हणाले की, 'कडक उन्हाळ्यात शेतकऱ्यांना राहण्यासाठी ही पक्की घरे बांधली जात आहेत. पंजाबमधील लोकांचा वारसा आहे की ते चांगले खातात, चांगले कपडे घालतात आणि चांगल्या प्रकारे जगतात. त्यामुळे पक्की घरे बांधून त्यात एसी लावले जातील. यामध्ये वृद्ध लोक आणि महिला राहतील.’
Kisan Social Army has constructed a permanent shelter at Tikri border as protest against farm laws continues
"These houses are strong, permanent just like the will of the farmers. 25 houses built, 1000-2000 similar houses to be built in coming days,"Anil Malik, Kisan Social Army pic.twitter.com/4ZudQTIAqj
— ANI (@ANI) March 13, 2021
मनजित राय पुढे म्हणाले की, 'काल कुंडली पोलिस स्टेशनचे एसएचओ आले होते, त्यांनी काम बंद केले आहे. परंतु हे कार्य थांबणार नाही. येथे पक्की घरे बांधली जातील आणि सरकार आमच्या मागण्या मान्य करेपर्यंत ती कायम राहतील, यासाठी जरी 2024 पर्यंत थांबावे लागले तरी चालेल.’
(हेही वाचा: Amarnath Yatra 2021: यंदा 28 जून ते 22 ऑगस्ट दरम्यान होणार अमरनाथ यात्रा)
शेतकरी सांगतात की आंदोलनाच्या सुरूवातीला ते ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये राहत होते. नंतर दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत त्यांनी तंबूत राहायला सुरुवात केली. आता शेतकरी म्हणतात की, दिल्लीच्या या उन्हात तंबूत राहणे अवघड आहे. अशा परिस्थितीत आम्ही विटांची घरे बांधण्यास सुरुवात केली, जो शेतकर्यांचा पक्का निवारा असेल. टिकरी सीमेवर सध्या 25 घरे उभारली आहेत पुढे 1000-2000 घरे उभारली जातील.