अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थाच ईडी द्वारा राष्ट्रीय जनता दल (Rashtriya Janata Dal) संस्थापक लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आणि त्यांचा मुलगा तथा बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांना समन्स पाठविण्यात आले आहे. नोकरीच्या बदल्यात रेल्वे जमीन घोटाळा प्रकरणात हे समन्स नव्याने पाठविण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ईडीने दोघा पितापुत्रांना वेगवेगल्या वेळी ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावल्याचे समजते. प्राप्त माहितीनुसार लालू प्रसाद यांना 29 जानेवारी तर त्याच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 जानेवारी रोजी तेजस्वी यादव यांना ईडी कार्यालयात बोलावण्यात आले आहे. कधीत रेल्वे जमीन नोकरी घोटाळा प्रकरणात या पितापुत्रांची आगोदरपासूनच चौकशी सुरु आहे. या आधीही ईडीने या दोघांना समन्स पाठवले आहे. मात्र, आता नव्याने या प्रकरणात समन्स आल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहे. लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनाही समन्स आल्याचे वृत्त आहे.
काय आहे प्रकरण?
ईडी द्वारा यादव कुटुंबीयांना नोटीस पाठविण्यात आलेला हा कथित घोटाळा लालू प्रसाद यादव काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए-1 सरकारमध्ये रेल्वेमंत्री असतानाच्या काळाशी संबंधित आहे. तपास एजन्सीनुसार, 2004 ते 2009 दरम्यान भारतीय रेल्वेच्या विविध झोनमध्ये ग्रुप "डी" पदांवर अनेकांची नियुक्ती करण्यात आली होती. या लोकांनी नोकरीसाठी त्यांची जमीन लालू यादव यांच्या कुटुंबीयांना आणि एके इन्फोसिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या लिंक्ड कंपनीला हस्तांतरित केली. (हेही वाचा, ED Summons MLA Rohit Pawar: रोहित पवार यांना ईडीचे समन्स, 24 जानेवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश)
अंमलबजावणी संचालनालयाकडून दावा
आपल्या आरोपपत्रात, अंमलबजावणी संचालनालयाने दावा केला आहे की AK इन्फोसिस्टम ही या प्रकरणात कथितपणे "लाभार्थी कंपनी" आहे आणि दक्षिण दिल्लीच्या न्यू फ्रेंड्स कॉलनीतील तिचा नोंदणीकृत पत्ता आहे. जो तेजस्वी यादव वापरत होते. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत दाखल करण्यात आलेला मनी लाँड्रिंगचा खटला, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने दाखल केलेल्या तक्रारीमुळे सुरु झाला आहे. (हेही वाचा, Tejashwi Yadav On Caste-Based Survey: जातनिहाय सर्वेक्षण प्रत्येक राज्यात व्हावे- तेजस्वी यादव)
ट्रायल कोर्टाकडूनजामीन मंजूर
लालू प्रसाद, तेजस्वी यादव आणि राबडी देवी यांना सीबीआय प्रकरणात गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ट्रायल कोर्टाने जामीन मंजूर केला होता. यापूर्वी राबडी देवी (68), आरजेडीच्या राज्यसभा खासदार मीसा भारती (47) आणि लालू यादव आणि राबडी देवी यांच्या दोन मुली - चंदा यादव आणि रागिणी यादव यांची या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. (हेही वाचा, ED Summons Kishori Pednekar: किशोरी पेडणेकर यांना ईडीचे समन्स, उद्धव ठाकरे गटाला दुसरा धक्का)
दरम्यान, महाराष्ट्रातही ईडी सक्रीय झाली आहे. या केंद्रीय तपास यंत्रणेने आजच महाविकासआघाडीतील दोन नेत्यांना समन्सपाठवले आहे. ज्यामध्ये शरद पवार समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा समावेश आहे.