ED Summons Kishori Pednekar: किशोरी पेडणेकर यांना ईडीचे समन्स, उद्धव ठाकरे गटाला दुसरा धक्का
Kishori Pednekar | (Photo Credit - X)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या शिवसेना (UBT) पक्षाच्या वतीने महापत्रकार परिषद घेत लोकन्यायालय भरवले. त्यानंतर राज्यात अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडीच्या कारवाया अधिक वाढल्या आहेत. नुकतीच आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्तीय असलेले सुरज चव्हाण यांना ईडीने अटक केली. त्यानंतर आज महाविकासाघाडीतील दोन नेत्यांना ईडीने समन्स धाडले आहे. एक रोहित पवार आणि दुसरे म्हणजे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar). या नोटीशीचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याशी संबंधीत मालमत्तांवरही यंत्रणांनी छापेमारी केली आहे.

'चौकशीला घाबरत नाही'

किशोरी पेडणेकर यांना येत्या 25 जानेवारी रोजी चौकशीला ईडी कार्यालयात बोलावण्यात आले आहे. पेडणेकर यांनी या कारवाईबाबत सडोतोड मत व्यक्त केले आहे. 'कर नाही त्याला डर कशाला'. आम्ही कोणतीही चूक केली नाही. जी कोणती कारवाई असेल त्याला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. ठाकरे म्हणजेच शिवसेना आणि आम्ही त्याच शिवसेनेसोबत राहणार. ठाकरे यांच्या शिवसेनेत राहणे हा जर गुन्हा असेल तर त्याची शिक्षा भोगण्याची तयारी आम्ही ठेवली आहे, अशी थेट भूमिका पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे. (हेही वाचा, ED Summons MLA Rohit Pawar: रोहित पवार यांना ईडीचे समन्स, 24 जानेवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश)

अगोदर पवार मग पेडणेकर

रोहीत पवार यांनाही ईडीने आजच (19 जानेवारी) समन्स पाठवले आहे. त्यांना येत्या 24 जानेवारीला ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. दुसऱ्या बाजूला त्याच्यात दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 जानेवारी रोजी किशोरी पेडणेकर यांना ईडी कार्यालयात हजर राहवे लागणार आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते ठरल्या दिवसी कार्यालयात हजर राहणार का? याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Rajan Salvi यांच्या रत्नागिरीच्या घरी पुन्हा ACB कडून छापेमारी; रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल)

काय आहे प्रकरण?

तपास यंत्रणांचा आरोप आहे की, डॉ. हरिदास राठोड (डेप्युटी डीन, केंद्रीय खरेदी विभागाचा अतिरिक्त कार्यभार) यांना किशोरी पेडणेकर यांनी महापौर असताना 16 मे ते 7 जून 2020 या कालावधीत बॉडी बॅग प्रत्येकी 6 हजार 719 रुपयांना विकत घेण्यास भाग पाडले. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनेही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवाल म्हणजेच एफआयआरमध्येही या बॉडी बॅगची खरेदी केल्याचा उल्लेख आहे.

सूरज चव्हाण यांना अटक

शिवसेना (UBT) पक्षातील युवासेना नेते सूरज चव्हाण यांनाही ईडीने नुकतीच अटक केली आहे. सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.