लवकरच जाहीर होणार निवडणुकीची तारीख, निवडणूक आयोगाचे संकेत
Image used for representational purpose | File Image

येत्या 2019 मधील लोकसभा निवडणुकीची तारीख अजून ही जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु निवडणुक आयोगाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोरात तयारी सुरु करण्यात आली आहे. त्याचसोबत 28 फेब्रुवारी पर्यंत प्रशासकीय तयारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी वेळ देऊ केला आहे.

मार्च 2019 मध्ये पहिल्या आठवड्यात निवडणुकांची तारीख जाहीर होईल अशी शक्यता बाळगली जात आहे. तर एप्रिल- मे महिन्यात निवडणुक होणार अशीसुद्धा शक्यता वर्तविली जात आहे. सुरक्षा व्यवस्थेबाबत गृह मंत्रालयासोबत चर्चा झाली आहे. त्यामुळे निमलष्कराची आवश्यकता पाहून किती टप्प्यात निवडणुक होणीर आणि कधी होणार याबद्दल ठरविले जाणार आहे. तसेच येत्या फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुक आयोगाची अंतिम बैठक गृहमंत्रालयासमोर होणार आहे.(हेही वाचा-युतीसाठी भारतीय जनता पक्ष लाचार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेला इशारा)

आगामी निवडणकीच्या सोबत काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची तयारी निवडणुक आयोगाकडून केली जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसह विधानसभा निवडणुका झाल्यास योग्य ठरणार असल्याचे भाजप पक्षाकडून सांगण्यात येत आहे.