Narendra modi (PTI)

जगभरातील ख्रिश्चन धर्मीयांसाठी आजचा दिवस हा खास आहे, आज 12 एप्रिल रोजी ईस्टर संडे (Easter Sunday 2020) साजरा केला जाणार आहे. प्रभू येशूच्या (Lord Christ) मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा जन्म घेतल्याचे मानले जाते हा आनंद साजरा करण्यासाठी दरवर्षी वसंत पौर्णिमेच्या नंतरच्या पहिल्या रविवारी ईस्टर संडे साजरा केला जातो. यंदा हा दिवस आज म्हणजेच 12 एप्रिल रोजी सेलिब्रेट केला जाणार आहे. या खास दिवसाच्या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासीयांना ट्विटच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. "प्रभू येशू यांनी गरजू आणि गरिबांच्या उद्धारासाठी आपले जीवन समर्पित केले होते त्यांचे आज ईस्टरच्या निमित्ताने स्मरण करूयात" असे मोदींनी म्हंटले आहे. तसेच "ईस्टरचा हा सण आपल्यावर आलेल्या कोव्हीड 19 (COVID 19) च्या संकटावर मात करण्यासाठी बळ देईल आणि एक सुधृढ विश्व पुन्हा स्थापन करण्याची सुरुवात ठरेल" अशी आशा मोदींनी ट्विट मध्ये व्यक्त केली आहे. Easter Sunday 2020: ईस्टर संडे का साजरा केला जातो? ख्रिश्चन धर्मियांच्या 'या' महत्वाच्या दिवसाविषयी जाणून घ्या सविस्तर

दरवर्षी ईस्टर संडे हा सण मोठ्या उत्साहात पार पडतो, अगदी साहित्य छोट्या भागातील चर्चमध्ये सुद्धा या निमित्त खास प्रार्थना (मास) चे आयोजन केले जाते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही सोहळा होणार नाहीये. त्यामुळे मुंबईतील अनेक चर्च आज पहिल्यांदा ईस्टरच्या दिवशी बंद आहेत. Easter Sunday 2020 HD Images: ईस्टर सणानिमित्त खास HD Greetings, Wallpapers, Wishes च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन, साजरा करा प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचा दिवस

नरेंद्र मोदी ट्विट

दरम्यान, ईस्टर या सणाच्या निमित्त ख्रिसमस/ नाताळप्रमाणेच सर्वत्र आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतं. ईस्टरच्या सणात अंड्याला खूप महत्त्व आहे. अंडे म्हणजे नवीन आयुष्याच्या सुरुवातीचे प्रतीक समजले जाते. आजच्या या दिवसापासून प्रत्येकाच्या आयुष्यात नवी सुरुवात व्हावी अशा सदिच्छा. लेटेस्टली परिवाराकडून सुद्धा आपणास Happy Easter!