Happy Easter 2020 (File Image)

Easter Sunday 2020 HD Images: आज, 12 एप्रिल रोजी जगात सर्व ख्रिश्चन बांधव ‘ईस्टर’ (Easter) हा सण साजरा करीत आहेत. ख्रिश्चन धर्मामध्ये ख्रिसमसपेक्षा ईस्टरचे महत्व अधिक आहे. याच दिवशी प्रभू येथू (Jesus Christ) मृत्युच्या दारातून परत आले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकटण्याचा आणि स्वर्गात आपल्या पित्याकडे जाण्याचा दिवस ईस्टर संडे (Easter Sunday) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जगभरातील तमाम चर्चेसमध्ये खास प्रार्थनांचे आयोजन केले जाते. शनिवारी रात्री खास मास पार पडतो. यावेळी ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने एकत्र येऊन प्रभू येशूने केलेल्या बलिदानाची आठवण ठेऊन, त्याने आपल्यासाठी पुन्हा जन्म घेतला याबाबत आभार व्यक्त करतात.

ईस्टरचा आठवडा हा पवित्र आठवडा (Holy Week) म्हणून समजला जातो. गुरुवारी रात्री प्रभू येशू यांनी आपल्या 12 अनुयायांसोबत शेवटचे भोजन (Last Supper) घेतले. त्यानंतर शुक्रवारी गुड फ्रायडेच्या दिवशी त्यांना क्रुसावर चढवले गेले. पुढे रविवारी ते पुन्हा जिवंत झाले, तर अशाप्रकारे या दिवशी येशू ख्रिस्त मृतातून पुनः उठला, त्याचे पुनरुत्थान झाले. म्हणूनच ख्रिश्चन धर्मियांसाठी हा दिवस फार महत्वाचा आहे. याच दिवशी 40 दिवसांच्या उपवासाचा (लेन्ट) हा काळ संपतो. तर अशा या आनंदाच्या दिवशी आपणही ईस्टर सणाच्या खास शुभेच्छा HD Greetings, Wallpapers, Wishes च्या सहाय्याने आपल्या कुटुंबाला, मित्र मैत्रिणींना देऊ शकता.

Easter Sunday 2020
Easter Sunday 2020
Easter Sunday 2020
Easter Sunday 2020
Easter Sunday 2020

(हेही वाचा: ईस्टर संडे का साजरा केला जातो? ख्रिश्चन धर्मियांच्या 'या' महत्वाच्या दिवसाविषयी जाणून घ्या सविस्तर)

दरम्यान, निरनिराळ्या प्रांतानुसार ईस्टर साजरा करण्याची पद्धत बदलते. ईस्टरच्या सणात अंड्यालाही खूप महत्त्व आहे. येशू नसलेल्या रिकाम्या कबरीचे प्रतिक म्हणजे अंडे, आणि प्रभू मृतातून उठला याचा आनंद झाला म्हणून अंडे सजवायचे अशी कल्पना आहे. ईस्टर संडेच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी ईस्टर बनी लहान मुलांसाठी रंगीबेरंगी ईस्टरची अंडी घराच्या कानाकोप-यात तसेच झाडाझुडूपांखाली लपवून जातो असे मानतात.