Easter 2020 Wishes For Employees (Photo Credits: File Photo)

जगभरातील ख्रिश्चन धर्मीयांसाठी रविवार 12 एप्रिल हा दिवस खास असणार आहे, यंदा या दिवशी ख्रिश्चन बांधव हे ईस्टर संडे (Easter Sunday) साजरा करणार आहेत. ईस्टरच्या तीन दिवस आधी म्हणजेच गुड फ्राय  डे (Good Friday) च्यादिवशी येशुंना क्रुसावर चढवण्यात आले होते, यावेळी त्यांनी नितांत यातना देण्यात आल्या, त्यांचे शरीर हे खिळ्यांनी ठोकण्यात आले होते, या यातनेतच प्रभू येशूचा (Lord Jejus) अंत झाला होता, मात्र या घटनेच्या तीन दिवसांनंतरच रविवारी येशूने पन्हा जन्म घेतला होता. त्या जन्म सोहळ्याचा आनंद म्ह्णून हा दिवस साजरा केला जातो. ईस्टर दरवर्षी निश्चित तारखेला ने येता 21 मार्च नंतर पहिल्यांदा पूर्ण चंद्र दिसल्या नंतरच्या पहिल्या रविवारी ईस्टर येतो.यंदा हा सण 12 एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे.

Easter Sunday साजरा करण्याची पद्धत

जगात वेगवेगळ्या ठिकाणी ईस्टर साजरा करण्याची पद्धत वेगळी आहे.

- जर्मनीत काही ठिकाणी उंचावरून अंडे खाली ढकलत न्यायचे.जो कोणी अंडे न फोडता खाली आणेल तो विजेता.

-काही ठिकाणी ईस्टर बनीला लहान मुले आपल्या इच्छा सांगणारे पत्र लिहितात आणि त्यांच्या पत्राला पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी ईस्टर बनी बनून उत्तर पाठवतात.

-अनेक बागांमध्ये लपवलेली अंडी मुलांनी शोधायची स्पर्धा असते.

- प्रोटेस्टंट पंथीय लोकात "प्रभू उठला आहे" असे म्हणून येणाऱ्यांचे स्वागत केले जाते तर दुसरा माणूस " हो खरच प्रभू उठला आहे" असे म्हणून त्या स्वागतास प्रत्युत्तर देतो.

Easter Eggs चे महत्त्व

ख्रिसमस/ नाताळप्रमाणेच या दिवशी सर्वत्र आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतं. ईस्टरच्या सणात अंड्याला खूप महत्त्व आहे. अंडे म्हणजे नवीन आयुष्याच्या सुरुवातीचे प्रतीक समजतात.येशू नसलेल्या रिकाम्या कबरीचे प्रतिक म्हणजे अंडे, आणि प्रभू कबरीतून उठला याचा आनंद झाला म्हणून अंडे सजवायचे अशी कल्पना आहे. या दिवशी अंड्याचे कवच रंगबेरंगी आकर्षक ढंगात सजवले जाते. यांना ईस्टर एग्ज म्हणून ओळखतात. ईस्टर संडेच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी ईस्टर बनी लहान मुलांसाठी रंगीबेरंगी ईस्टरची अंडी घराच्या कानाकोप-यात तसेच झाडाझुडूपांखाली लपवून जातो असे मानतात.

वास्तविक ईस्टरच्या आदल्या रात्री चर्चमध्ये प्रार्थनेचे (मास)चे आयोजन केले जाते. यावेळी ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने एकत्र येऊन प्रभू येशूने केलेल्या बलिदानाची आठवण ठेऊन, त्याने आपल्यासाठी पुन्हा जन्म घेतला याबाबत आभार व्यक्त करतात. यंदा मात्र हे सेलिब्रेशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने आपापल्या घरीच करावे असे आवाहन करण्यात आले आहे.