Mild tremor hits Palghar district | Representational Image | (Photo Credits: PTI)

पोर्ट ब्लेअर (Port Blair) आणि अंदमान निकोबार (Andaman Nicobar) बेटांपासून 215 किमी अंतरावर भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. नेशनल सेंटर फॉर सेस्मोलोजीने (National Center For Seismology) ही माहिती दिली असुन या भुकंपाची  तीव्रता 5.0 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी 5:57 वाजता बेटांवर भूकंपाचे धक्के जाणवले असुन सुदैवाची बाब म्हणजे या  घटनेत  कोणतीही जीवितहानी झाल्याची अद्याप  माहिती समोर आलेली नाही.

 

काल रात्री अंदमान आणि निकोबार बेटावर पाऊस पडत असुन वातावरण थंड होते. मात्र आज पहाटे अचानक जमीनीला हादरे बसू लागले आणि हे धक्के इतके जोरदार होते की परिसरातील नागरिक घाबरून घराबाहेर पडले. आज अंदमान-निकोबार येथे झालेल्या या भुंकपाची तीव्रता अधिक होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडून नागरिकांना सुरक्षा बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ट्विट करत या भूकंपाच्या तीव्रतेची माहिती दिली आहे. (हे ही वाचा:-Mumbai High Tide Timing Today: मुंबई मध्ये मागील 12 तासांत 95.81mm पाऊस; भरतीची वेळ संध्याकाळी 4 च्या सुमारास)

 

याआधी 4 जुलैला अंदमान-निकोबारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्या हादऱ्यांची तीव्रता 4.4 रिश्टर स्केल इतकी असुन या भूकंपाचा केंद्रबिंदू पोर्ट ब्लेअरपासून 256 किमी आग्नेयेला होता. त्या भुंकपातही बेटावर कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.