वसुंधरा दिन 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 50व्या Earth Day निमित्त खास ट्विट; प्रेम आणि काळजी साठी मानले पृथ्वीमातेचे आभार
PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

आजचा दिवस म्हणजेच 22 एप्रिल संपूर्ण जगभरात पृथ्वी दिवस किंवा वसुंधरा दिन (Earth Day) म्हणून साजरा केला जातो. यंदा या वसुंधरा दिनाचे 50 वे वर्ष आहे, यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी एक खास ट्विट करून मानवजातीचे अस्तित्व जपणाऱ्या पृथ्वी मातेचे आभार मानले आहेत. "आंतरराष्ट्रीय वसुंधरा दिनाच्या निमित्त, आपल्यावरील प्रेम आणि काही साठी पृथ्वी मातेचे आभार मानुयात, येत्या काळात आपण स्वच्छ, आरोग्यदायी आणि अधिक समृद्ध ग्रह टिकवून ठेवण्यासाठी कार्य करू अशी शपथ घेऊयात" असे मोदींनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे. तसेच पृथ्वीवरील संकट कोरोना व्हायरसशी (Coronavirus) लढणाऱ्या सर्व योद्धांचे मोदींनी यानिमित्ताने कौतुक करत आभार मानले आहेत. Earth Day 2020: जागतिक पृथ्वी दिना निमित्त टाळा पर्यावरणाचा -हास करणा-या 'या' गोष्टी आणि जपा वसुंधरेचे पावित्र्य

काय आहे वसुंधरा दिनाचा इतिहास?

1969 मध्ये सांता बारबरा, कॅलिफोर्निया मध्ये 30 लाख गॅलेन तेलाच्या गळतीमुळे 10,000 सी बर्ड्स, डॉल्फिन मासे, सील आदि समुद्री जीवांचा मृत्यू झाला. याविरोधात अमेरिकी सीनेटर गेलॉर्ड नेल्सनने पर्यावरणाच्या रक्षणासाठी 22 एप्रिल 1970 या दिवशी 2 कोटीपेक्षा जास्त अमेरिकन विद्यार्थी, प्राध्यापकांना समवेत मोठे आंदोलन केले. याआधी पृथ्वीवर एवढ्या मोठया स्वरूपात आंदोलन कधीच झाले नव्हते. या आंदोलनाला जगभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला ज्यामुळे हा दिवस आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.वसुंधरा दिन 2020: पृथ्वी दिनाच्या 50 व्या वर्धापनदिना निमित्त Google ने खास Doodle बनवून मधमाशांसाठी केले समर्पित

नरेंद्र मोदी ट्विट

दरम्यान, अनेकदा मानवी कृत्यातून आजही पृथ्वीच्या आरोग्यास धक्का पोहचवतील अशा घटना घडत आहेत. येत्या काळात पृथ्वीवरील मानवी अस्तित्व कायम राहावे अशी इच्छा असेल तर कार्य करणे आवश्यक आहे. पृथ्वीच्या रक्षणातून आपलाच फायदा आहे हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येकाने या दिवशी निसर्गाप्रतीच्या निदान स्वतःच्या वागणुकीकडे तरी लक्ष देण्याचा निर्धार करावा.