Dutch Woman Marries Indian Man: उत्तर प्रदेश राज्यात एका हटके विवाहाची चर्चा रंगली आहे. राज्यातील फतेहपूर जिल्ह्यातील 32 वर्षीय हार्दिक वर्मा (Hardik Verma) याने डच गर्लफ्रेंडसोबत (Dutch Girlfriend) विवाह केला आहे. विशेष म्हणजे नेदरलँडमधील रहिवासी असलेल्या त्याच्या 21 वर्षीय प्रेयसीसोबत त्याने हिंदू विवाह पद्धतीनुसार (Hindu Traditions) सात फेरे घेतले आहेत. गॅब्रिएला डुडा (Gabriela Duda) असे या डच तरुणीचे नाव आहे. जी आता यूपीतील वर्मा कुटुंबीयांची सून झाली आहे. हा विवाह 29 नोव्हेंबर रोजी पार पडला. फतेहपूर येथील एका खेडेगावातील हार्दिक हा एका फार्मास्युटिकल कंपनीत पर्यवेक्षी पदावर काम करताना नेदरलँडला गेला होता. तेथे त्याची भेट गॅब्रिएला या महिला सहकाऱ्याशी झाली आणि पुढे त्यांनी जवणभरासाठी एकत्र राहण्यासाठी सात फेरे घेतले.
हार्दिक वर्मा आणि गॅब्रिएला डुडा हे दोघे जवळपास तीन वर्षे परस्परांसोबत राहात होते. दोघांचेही एकमेकांवर प्रेम असल्याने ते परस्परांना डेट करत होते. प्रेमाचा बहर दिवसेंदिवस अधिकच वाढतो आहे हे लक्षात आल्याने दोघांनीही पती-पत्नी म्हणून जीवनसाथी होण्याचे स्वप्न पाहिले. तसा निर्णय त्यांनी आपल्या कुटुंबीयांनाही कळवला. जो दोघांच्याही पालकांनी मनापासून स्वीकारला. गेल्या आठवड्यात गॅब्रिएलासह त्याच्या गावी परतल्यानंतर, या जोडप्याचे कुटुंब आणि गावकऱ्यांकडून जोरदार स्वागत झाले.ज्यांनी आनंदी विवाह सोहळ्यात उत्साहाने भाग घेतला. (हेही वाचा, Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?)
एक्स पोस्ट
Meet Hardik Verma. He married his Dutch girlfriend, as per Hindu Customs. pic.twitter.com/SmIukbLOw6
— JyotiKarma🚩🇮🇳 (@JyotiKarma7) December 1, 2023
हार्दिक याने इंडिया टुडेशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, 3 डिसेंबर रोजी, हे जोडपे, हार्दिकच्या कुटुंबासह, गुजरातमधील गांधीनगर येथील त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी जाणार आहेत. हार्दिकने स्पष्ट केल्याप्रमाणे फतेहपूरमध्ये लग्न करण्याचा निर्णय या जोडप्याच्या वडिलोपार्जित संबंधांवर आधारित होता. जोडप्याचे रिसेप्शन येत्या 11 डिसेंबर रोजी गांधीनगर येथे पार पडणार आहे. ज्यामध्ये गॅब्रिएलाचे वडील, मार्सिन डुडा, तिची आई, बार्बरा डुडा आणि इतर कुटुंबातील सदस्य उपस्थित राहणार आहेत. भारतीय परंपरेनुसार सर्व विधीवत पार पडल्यानंतर हे जोडपे 25 डिसेंबर रोजी नेदरलँड्सला परततणा आहे. जिथे त्यांचा स्थानिक चर्चमध्ये ख्रिश्चन पद्धतीने विवाह सोहळा पार पडणार आहे.
अशाच प्रकारचा एक विवाह काही दिवसांपूर्वीच पार पडला होता. खरेतर तो विवाह नव्हता. प्रेमप्रकरण होते. पाकिस्तानातील एक महिला आपल्या चार मुलांसह भारतात आली होती. तिने भारतातील एका सचिन नामक तरुणाशी विवाह करुन दिल्ली येथील एका परिसरात ती वास्तव्यास होती. त्यांच्या प्रेमाची कोणालाही कल्पना नव्हती. मात्र, दिल्ली पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळ्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते.