Dowry Death Case: हुंड्याची मागणी पूर्ण करण्यात अयशस्वी ठरल्याने 2017 मध्ये पत्नीची हत्या केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश न्यायालयाने पती, त्याची आई आणि भावाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पवन कुमार श्रीवास्तव यांनी 8 नोव्हेंबर रोजी आनंद सिंग (34), त्याचा भाऊ रामानंद सिंग (28) आणि आई कमला देवी (60) या तीन दोषींना 1.11 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. जिल्हा सरकारी वकील संतोषकुमार मिश्रा यांनी शनिवारी सांगितले. (UP Road Accident: फिरोजाबादमधील आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर बसचा अपघात; 5 जणांचा मृत्यू, अनेक जखमी (Watch Video))
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित रेणू सिंगने 2015 मध्ये आरोपी आनंद यांच्यासोबत लग्न केले होते. महाराजगंज जिल्ह्यातील पनियारा पोलिस स्टेशनच्या बैदा बाजार येथे रेणूचे वडील दीना नाथ सिंह यांनी आनंद आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात मुलीच्या हत्येची तक्रार नोंदवली. या प्रकरणी आरोपींवर कलम 498 अ (महिलेचा पती किंवा नातेवाईक तिच्यावर अत्याचार करणे), 304 बी (हुंडा मृत्यू), 302 (हत्यासाठी शिक्षा), 323 (स्वच्छेने दुखापत करण्यासाठी शिक्षा) आणि 34 (अनेक जणांनी केलेली कृत्ये) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेणूच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने शुक्रवारी आनंद, रामानंद आणि कमला यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच तिघांना 1.11 लाख रुपयांचा दंडही ठोठावला, असे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील मिश्रा यांनी सांगितले.