UP Road Accident: फिरोजाबादमधील आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर बसचा अपघात; 5 जणांचा मृत्यू, अनेक जखमी (Watch Video)

फिरोजाबाद जिल्ह्यातील आग्रा-लखनऊ एक्स्प्रेसवेवर बसची उभ्या असलेल्या वाहनाला धडक बसल्याने 5 जणांचा मृत्यू झाला. तर, अनेक जण जखमी झाले.

UP Road Accident: फिरोजाबादमधील आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर बसचा अपघात; 5 जणांचा मृत्यू, अनेक जखमी (Watch Video)
Photo Credit- X

UP Road Accident: फिरोजाबाद जिल्ह्यातील आग्रा-लखनऊ एक्स्प्रेसवेवर (Agra- Lucknow Expressway)बसची उभ्या असलेल्या वाहनाला धडक बसल्याने 5 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. पोलिस अधीक्षक (एसपी) ग्रामीण फिरोजाबाद अखिलेश भदोरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस मथुरेहून लखनऊच्या दिशेने जात असताना थाना नसीरपूरजवळ पार्क केलेल्या वाहनाला ती धडकली. या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले.

चालकाच्या निष्काळजीपणामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले, असे पोलिसांना त्यांच्या तपासात आढळून आले. अपघातावेळी बसमध्ये 20 लोक होते. मथुरेहून परतत असताना अपघात झाला. जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर एक्स्प्रेस वेवर गोंधळ उडाला. या घटनेचे साक्षीदार असलेल्या काही लोकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि जखमींना मदत केली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.

फिरोजाबादमधील आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर बसचा अपघात

(The above story first appeared on LatestLY on Nov 09, 2024 09:57 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).