Uttar Pradesh Shocker: मैनपुरी येथील महाराजा तेज सिंह जिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहल्ला सौथियाना येथील 60 वर्षीय महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Woman Dies of Heart Attack) झाला. प्रवेश कुमारी असे मृत महिलेचे नाव आहे. डॉक्टर इंस्टाग्रामवर (Instagram) रिल्स पाहण्यात व्यस्त (Doctor Watching Reels) असल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांना आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आले होते. वेळीच उपचार झाला असता तर त्यांना वाचवण्यात आले असते. परंतु डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला. (Andhra Pradesh Crime: विम्याचे पैसे मिळण्यासाठी बहिणीची हत्या; आंध्र प्रदेशमधून रिअल इस्टेट एजंटला अटक)
या घटनेत डॉक्टरांची भूीकाही निष्काळजीपणाची होती, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. आपत्कालीन परिस्थितीत तैनात असलेले डॉक्टर रुग्णाला पाहण्याऐवजी खुर्चीवर बसून इंस्टाग्राम आणि फेसबुकवरील रील पाहण्यात मग्न असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. डॉ. आदर्श संगर असे डॉक्टरचे नाव आहे. कुटुंबातील सदस्यांनी वारंवार विनंती करूनही, डॉक्टरांनी रुग्णाला भेटण्याची तसदी घेतली नाही. त्याउलट नर्सला रूग्णाला हाताळण्यासाठी सांगितले. जेव्हा रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर झाली तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी निषेध केला. त्यावर त्यांनाच मारहाण करण्यात आली.
कुटुंबातील सदस्यांना मारहाण
मृत महिलेच्या कुटुंबीयांनी डॉ. आदर्श सेंगर यांना रिल्स पाहण्याचे सोडून रुग्णावर उपचार न करण्यावर दोषी ठरवताच त्यांच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली. मृत महिलेचा मुलगा गुरुशरण सिंग याला मारहाण केली. याच घटनेदरम्यान, प्रवेश कुमारी यांचे निधन झाले. तेथील परिस्थिती बिकट होत असल्याचे पाहून मोठा पोलिस बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे.
कुटुंबातील सदस्यांना मारहाण
A 7 min video showing unattended female patient and #doctor seen continuously over mobile, not even once he tried to attend the patient until she collapsed in District Govt Hospital #Mainpuri City, UP.
After seeing the patient collapsing, he is still seen arguing instead of… pic.twitter.com/xMyiSjRwMd
— OncoBae (@dr_ajitsolanky) January 29, 2025
कुटुंबातील सदस्य आणि कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये डॉक्टर मृत महिलेच्या मुलाला मारताना दिसत आहेत. रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. मदनलाल यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेमुळे काही ठिकाणी डॉक्टरांचा बेजबाबदारपणा पुन्हा उघडकीस आला आहे.